भारतीय वनडे संघात मोठा फेरबदल, 7 खेळाडूंना बाहेरचा रस्ता! निवडकर्त्यांचा मोठा निर्णय
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने टीम इंडियाची घोषणा केली आहे (IND vs SA). या वेळी निवडकर्त्यांनी काही आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले आहेत.
या मालिकेसाठी 7 खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाही. शुबमन गिलला (Shubman gill) दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) हे देखील दुखापतीमुळे या मालिकेत नाहीत.
तसेच जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली आहे. मात्र अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद सिराज यांना निवड समितीने या वेळी संघात स्थान दिलेले नाही.
या सात खेळाडूंना वनडे टीममध्ये जागा मिळाली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना 30 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.
Comments are closed.