IPL: शेवटच्या हंगामात 'या' 7 फलंदाजांची विक्रमी फटकेबाजी, 500+ धावांचा टप्पा पार!
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League 2025) सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. तत्पूर्वी आयपीएल 2024च्या हंगामात अनेक फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 500 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला. दरम्यान दिग्गज खेळाडू विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. चला तर मग या बातमीद्वारे आपण शेवटच्या आयपीएल हंगामात 500 हून अधिक धावा केलेल्या 7 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
1) विराट कोहली- 2024च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 15 सामन्यांत 741 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. कोहलीने या हंगामात 5 अर्धशतकांसह 1 अर्धशतक झळकावले. दरम्यान विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात दोनदा ऑरेंज कॅप (Orange Cap) जिंकणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.
2) रूतुराज गायकवाड- चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार रूतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शेवटच्या आयपीएल हंगामात 14 सामन्यांत 53च्या सरासरीने 583 धावा केल्या. यादरम्यान त्याने एका शतकासह 4 अर्धशतके झळकावली.
3) रायन पॅराग- राजस्थान रॉयल्सचा (RR) युवा फलंदाज रियान परागने (Riyan Parag) शेवटच्या आयपीएल हंगामात 16 सामन्यांत 52.09च्या सरासरीने 573 धावा केल्या. यादरम्यान रियानने या हंगामात 4 अर्धशतके झळकावली.
4) ट्रॅव्हिस हेड- सनरायझर्स हैदराबादचा (SRH) विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेडने (Travis Head) शेवटच्या हंगामात आपल्या आक्रमक फलंदाजीने धूमाकूळ घातला. हेडने 15 सामन्यांत 191.55च्या सरासरीने 567 धावा केल्या. त्याने या हंगामात एका शतकासह 4 अर्धशतके झळकावली. हेडच्या या आक्रमक खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले.
5) संजू सॅमसन- राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) शेवटच्या आयपीएल हंगामात 16 सामन्यांत 48.27च्या सरासरीने 531 धावा केल्या. संजूने या हंगामात 5 अर्धशतके झळकावली.
6) साई सुदीरशान- गुजरात टायटन्सचा (GT) युवा फलंदाज साई सुदर्शनने (Sai Sudharsan) 12 सामन्यांत 47.91च्या सरासरीने 527 धावा केल्या. त्याने या हंगामात एका शतकासह 2 अर्धशतके झळकावली.
7) केएल राहुल- लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) 14 सामन्यांत 37.14च्या सरासरीने 520 धावा केल्या. केएल राहुलने या हंगामात 4 अर्धशतके झळकावली होती. आता यंदाच्या आयपीएल हंगामात केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.
आता यंदाच्या आयपीएल हंगामात कोणते खेळाडू फलंदाजीत आपला दम दाखवतील? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल. (Which Players Will Score The Most In This IPL Season?)
Comments are closed.