पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये वेगळे असतात हे 7 नियम! जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्यस्त आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian cricket women’s team) 2025 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाल करत आहे. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता 2 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का? पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये 7 महत्त्वाचे नियम वेगळे असतात! चला, जाणून घेऊया या दोन्ही खेळांतील काही प्रमुख फरक
पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी सामना 5 दिवसांचा असतो, तर महिला कसोटी सामना 4 दिवसांचा खेळला जातो. पुरुष कसोटी सामन्यात दररोज किमान 90 षटकांचे खेळ होतात, तर महिला कसोटीमध्ये दररोज किमान 100 षटके टाकणे बंधनकारक असते.
वनडे क्रिकेटमध्येही फरक आहे. पुरुषांच्या सामन्यात तीन ‘पॉवरप्ले’ असतात, तर महिला सामन्यात फक्त एकच ‘पॉवरप्ले’ दिला जातो.
पुरुषांच्या वनडे सामन्यात बाउंड्रीचे अंतर किमान 59.43 मीटर आणि जास्तीत जास्त 82 मीटर असते. महिला सामन्यात हे अंतर किमान 54.86 मीटर आणि जास्तीत जास्त 64 मीटर असते. तसेच दोघांच्या ‘इन-सर्कल’च्या अंतरातही फरक आहे. पुरुष सामन्यात 30 मीटर तर महिला सामन्यात 25 मीटरचे अंतर असते.
शेवटी, चेंडूच्या वजनातही बदल असतो. महिला क्रिकेटमधील चेंडूचे वजन किमान 142 ग्रॅम असते, तर पुरुष क्रिकेटमध्ये तो किमान 156 ग्रॅमचा असतो.
 
			 
											
Comments are closed.