रत्नागिरीत 8 वाहनचालकांना 7 हजाराचा दंड; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त सुरु

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथकांनी गस्त सुरू केली आहे. गस्तीदरम्यान 30 चारचाकी आणि 18 दुचाकी वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 8 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून 7 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच दोन बुलेट गाड्यांच्या सायलेंसरमध्ये बदल करण्यात आले असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला.तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी वाहन तपासणी करण्यात आली.

Comments are closed.