Health Tips : या पदार्थांनी वाढेल मुलांची स्मरणशक्ती
आपली मुलं प्रत्येक गोष्टीत हुशार आणि यशस्वी असावीत, हे प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं. त्यांना उत्तम शिक्षण, योग्य मार्गदर्शन, आणि आवश्यक कौशल्य मिळावं यासाठी पालक नेहमीच धडपड करत असतात. परंतु मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी फक्त्त शाळेचा अभ्यास पुरेसा नसून, त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्यं, आत्मविश्वास, चांगल्या सवयी बाळगण देखील अत्यंत गरजेचं आहे. मुलं अनेकदा कामं विसरतात, आणि याची विविध कारणं असू शकतात. स्मरणशक्ती कमी होण्याची काही सामान्य कारणं आहेत आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या पदार्थांनी मुलांची स्मरणशक्ती वाढेल.
स्मरणशक्ती कमी होण्याची कारणं
- तणातवतणाव वाढल्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते.
- झोप कमी झाल्यामुळे, शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं कठीण होतं.
- सतत विचलित होणं किंवा एकाग्रतेचा अभाव यामुळे देखील लक्षात राहत नाही.
- अपुरं आहार म्हणजे, विशिष्ट जीवनसत्वांची कमतरता, जसे की व्हिटॅमिन बी-12, स्मरणशक्तीवर परिणाम करू शकते.
या पदार्थांनी वाढेल मुलांची स्मरणशक्ती
फळे आणि भाज्या
फळे आणि भाज्या स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूला सक्रिय करते. तसेच फळे आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मॅग्नेशिअमयुक्त पदार्थही खूप फायदेशीर असतात.यामध्ये सफरचंद, सेलेरी, चेरी, अंजीर, भाज्या, पपई, मटार, मनुका, बटाटा, हिरवी पाले आणि अक्रोड इत्यादींचा आहारात समावेश करू शकता.
– जाहिरात –
अंडी
अंड्यांमध्ये असलेले कोलीन हे स्मृती टिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी आवश्यक असलेले न्यूरोट्रांसमीटर आहे. अंड्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन बी6, बी12 आणि फॉलिक ॲसिड यांसारखे पोषक तत्व मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
मासे
माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर आहे.
– जाहिरात –
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, आयोडीन, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात. त्याचबरोबर आयुर्वेदानुसार, गाईचे दूध स्मरणशक्ती सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. दूध हे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते.
हेही वाचा : Bird Flu : फ्रीजमध्ये ठेवलेल्या कच्च्या दूधामुळे होऊ शकतो बर्ड फ्लू
संपादन : प्राची मांजरेकर
Comments are closed.