Weight loss tips : वेट लॉससाठी सायकलिंग की स्किपिंग उपयुक्त ?
आजच्या काळात प्रत्येकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी योग्य आहारासोबतच व्यायाम करणेही खूप गरजेचे आहे. साधारणपणे, आपण आपल्या वर्कआउटमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट करतो. सामान्यत: सायकलिंग आणि स्किपिंग दोन्ही वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. परंतु बहुतेक लोक स्कीपिंग किंवा सायकलिंग यापैकी नेमके काय करावे याबद्दल गोंधळलेले आहेत.
तसं पाहायला गेलं तर, दोन्ही व्यायामांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत आणि योग्य परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला ते आधी समजून घ्यावे लागतील. यानंतरच तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम व्यायाम आणि योग्य वर्कआउट रूटीन फॉलो करू शकाल. दोरीउड्या मारणे हा एक उच्च-तीव्रतेचा व्यायाम आहे जो कमी वेळेत अधिक कॅलरी बर्न करतो, सायकल चालवणे हा कमी प्रभावाचा पर्याय आहे आणि तुम्ही लॉन्ग कार्डिओ सेशनमध्ये त्याचा समावेश करू शकता. या लेखात आज आपण जाणून घेऊयात की वजन कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे याबद्दल.
कॅलरी बर्न :
सायकलिंग आणि स्कीपिंग म्हणजेच दोरीउड्या मारणे हे दोन्ही कॅलरी बर्न करण्याचे उत्तम मार्ग आहेत, परंतु जेव्हा कमी कालावधीत तीव्र कॅलरी बर्न करायच्या असतात तेव्हा स्कीपिंग हा उत्तम पर्याय समजला जातो. एक तास सायकल चालवल्याने 300-800 कॅलरीज बर्न होऊ शकतात, हे तुमच्या सायकलिंगचा वेग, पेडलिंग इत्यादींवर अवलंबून असते. त्याच वेळी, 15-मिनिटांचे स्किपिंग तुमच्या वेग आणि तीव्रतेनुसार 200-300 कॅलरीज बर्न करू शकते.
मसल टोनिंग आणि स्ट्रेन्थ :
सायकलिंग आणि स्किपिंग देखील मसलच्या टोनिंग आणि ताकदीसाठी चांगले मानले जाते. सायकल चालवणे हे पाय, पोटऱ्या आणि मांड्यांसाठी चांगले मानले जाते. स्कीपिंग तुमच्या संपूर्ण शरीरावर जसे की हात, खांदे आणि पाय यावर कार्य करते. म्हणून, जेव्हा बॉडी टोनिंगचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही स्किपिंग निवडले पाहिजे, तर स्टॅमिना सुधारण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे.
सांध्यांवर परिणाम :
हा कमी प्रभावाचा वर्कआउट असल्याने, जर एखाद्याला गुडघ्याचा त्रास होत असेल किंवा तुम्ही नुकतेच व्यायाम करायला सुरुवात केली असेल, तर तुम्ही सायकलिंग करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायची असतील आणि तुमच्या हाडांमधला समन्वय सुधारायचा असेल तर स्किपिंग करता येते. हा एक उच्च प्रभावाचा व्यायाम आहे, त्यामुळे जर तुम्ही लक्ष दिले नाही तर त्याचा तुमच्या गुडघे आणि घोट्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सांधे सुरक्षिततेच्या दृष्टीने सायकल चालवणे चांगले मानले जाते.
नक्की कोणाला निवडायचे ?
आता प्रश्न पडतो की सायकलिंग आणि स्किपिंग यापैकी कोणाची
निवड करावी .तर हे तुमच्या प्राधान्य क्रमावर आणि तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कमी प्रभावाचा कार्डिओ निवडायचा असेल जो तुम्ही दीर्घकाळ करू शकता, तर सायकलिंग निवडा. त्याच वेळी, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि उच्च तीव्रतेचा आणि जागा वाचवणारा व्यायाम करायचा असेल तर स्किपिंग तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
हेही वाचा : Health Tips : दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी लावा या सवयी
संपादन- तन्वी गुंडये
Comments are closed.