Mushroom : मशरूम फ्रेश राहण्यासाठी टिप्स
मशरूम सूप बनवण्यासाठी किंवा भाजीत वापरली जातात. याशिवाय स्नॅक्समधील काही पदार्थ बनवण्यासाठी मशरूमचा उपयोग केला जातो. जसे की, मशरूम टिक्का, पिझ्झा. मशरूमची चव काहींना आवडते तर काहीजणांना आवडत नाही. मशरूम स्टोअर करणे कठीण काम असते, कारण यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. बाजारातून मशरूम खरेदी करून आणल्यावर 2 ते 3 दिवसात वापरणे भाग असते, अनथ्या खराब होऊ शकतात. मशरूम योग्यरित्या स्टोअर न केल्यास चिकट आणि त्यांना बुरशी लागू शकते. अशावेळी मशरूम स्टोअर कसे करायचे हे माहित असणे आवश्यक आहे.
- साधारणपणे, मशरूम ज्या बॉक्समध्ये खरेदी करून आणले जातात. त्याच बॉक्समध्ये ठेवले जातात. पण, जर तुम्ही मशरूम स्वच्छ करून स्टोअर करणार असाल तर यासाठी टॉवेलमध्ये तुम्ही ठेवू शकता. यासाठी एका कंटेनरमध्ये टॉवेल ठेवा आणि त्यावर मशरूम पसरवून ठेवा. यानंतर एक पेपर त्यावर ठेवा. यामुळे मशरूममधील पाणी शोषले जाईल आणि मशरूम खराब होणार नाहीत.
- मशरूम खरेदी करून आणल्यानंतर लगेचच धुवू नयेत. याउलट जेव्हा तुम्ही त्याचा पदार्थ बनवणार असाल तेव्हाचे ते स्वच्छ करावे. मशरूम स्वच्छ करण्यासाठी मऊ कापडाने स्वच्छ करावेत आणि न धुता पेपरबॅगमध्ये स्टोअर करावेत. या टिप्सने मशरूम फ्रेश राहतात.
- मशरूम कोथिंबीरीसोबत स्टोअर करावेत. यामुळे मशरूममधील ओलावा शोषला जातो. याशिवाय कोंथिबीरीतीत बॅक्टेरियाच्या वाढीस रोखणारे कंपाउंड असतात, जे मशरूम खराब होऊ देत नाही. यामुळे मशरूम फ्रेश राहतात.
- मशरूम तुम्ही डिप फ्रीज करू शकता. अनेकांना असे वाटते की, फ्रीझिंग मशरूममुळे चव खराब होते. पण, हे पूर्णत: चुकीचे आहे. डिप फ्रीज करण्यासाठी मशरूम कापून घ्यावेत. यानंतर पाण्यात उकळवा किंवा भाजता देखील येते. मशरूम थंड झाले की, हवाबंद डब्यात स्टोअर करावेत.
- मशरूम स्टोअर करण्यासाठी झिपलॉक बॅगचा वापर करात येईल. फक्त या बॅगेत मशरूम स्टोअर करताना त्यात हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- मशरूम फ्रेश राहण्यासाठी तुम्ही कापडाची पिशवीचा वापर करू शकता. कापडाची पिशवीत मशरूम दिर्घकाळ फ्रेश राहतात.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे
Comments are closed.