Christmas 2024 : यासाठी साजरा केला जातो ख्रिसमस
नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. हा सण 12 दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते. जगाभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
कथांनुसार, हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, प्रभू येशू म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला. सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनसने 221 मध्ये पहिल्यांदा येशू ख्रिस्ताची जयंती 25 डिसेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आजपर्यंत 25 डिसेंबर हा दिवस देशात आणि जगात ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो.
– जाहिरात –
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिसमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेच्या स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जातो. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे. दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसा अर्पण केला जातो.
– जाहिरात –
ख्रिसमस आणि सांताक्लॉज मध्ये काय आहे संबंध ?
येशू ख्रिस्ताचा जन्म ख्रिसमसला झाला, पण मग हा दिवस सांताक्लॉजच्या नावाने का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. खरंतर, सांताचे खरे नाव सांता निकोलस आहे, सांता त्याच्या मिसेस क्लॉजसोबत उत्तर ध्रुवावर राहतो. तो पांढरा दाढी असलेला आनंदी हसतमुख माणूस आहे, ज्याचे हृदय करुणेने भरलेले आहे. संत निकोलस गरजू आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी फिरत असत.
त्या भागातील मुलांना आणि खलाशांनाही त्यांनी खूप मदत केली आहे. सांता लोकांना खूप मदत करायचा आणि मुलांना भेटवस्तू द्यायचा. तो एक महान आणि दयाळू व्यक्ती मानला जात असे. म्हणूनच सांता नाताळशी जोडला गेला कारण प्रभू येशूने देखील सर्वांना मदत केली होती. त्याला वधस्तंभावर खिळले जात असतानाही त्याने लोकांसाठी प्रार्थना केली होती. यासाठीच सांताक्लॉजला येशू ख्रिस्ताचा देवदूत समजले जाते.
25 डिसेंबरला मध्यरात्री सांताक्लॉज घरोघरी जाऊन लहान मुलांना भेटवस्तू देतात आणि खाऊ देतात अशी समजूत आहे. या सणानिमित्त चॉकलेट केक, कुकीज बनवल्या जातात. महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधव दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. ख्रिसमस ट्री सजवतात. ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंव्हा गायीचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे. हा सण लहान थोर सर्वच जण अगदी उत्साहाने, आनंदाने साजरा करतात. हा सण सर्वांना एकत्र आणणारा सण आहे.
हेही वाचा : Christmas Gift Ideas : ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीला हे गिफ्ट द्या
संपादन- तन्वी गुंडये
Comments are closed.