Health Tips : संध्याकाळी खाऊ नयेत ही फळं
आपल्या आरोग्यासाठी फळे खूप फायदेशीर असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का काही अशी फळे आहेत जी रात्री किंवा संध्याकाळी खाऊ नयेत? जाणून घेऊया त्या फळांविषयी जी फळे तुम्ही रात्रीच्या वेळी खाणे टाळले पाहिजे.
1. कलिंगड :
– जाहिरात –
उन्हाळ्यात टरबूज अनेकदा खाल्ले जाते, परंतु हे फळ संध्याकाळी आणि रात्री खाऊ नये. याचा प्रकृती थंड असते, ज्यामुळे रात्री शरीराचे तापमान कमी होते. याशिवाय पोटात गॅस, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे फळ दिवसा खाणे चांगले.
2. द्राक्षे :
– जाहिरात –
द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, जे रात्रीच्या वेळी पचनसंस्थेला त्रास देऊ शकते. याचे सेवन केल्याने रात्रीच्या वेळी पोट जड होऊ शकते आणि झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसा द्राक्षे खावीत.
3. केळी :
रात्री केळी खाल्ल्याने शरीरातील स्लीपिंग हार्मोन मेलाटोनिनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे झोपेच्या सवयी बिघडू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे रात्री झोपताना त्रास होऊ शकतो.
4. काकडी :
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी जमा होऊ शकते. रात्री काकडी खाल्ल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये जावेसे वाटू शकते, ज्यामुळे तुमची झोपमोड होते. त्यामुळे काकडी दिवसा खाणे अधिक फायदेशीर आहे. तुम्ही दुपारच्या जेवणासोबतही याचे सेवन करू शकता.
5. आंबा :
आंबा चवीला गोड असतो.पण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रात्री पचनक्रिया मंदावते. विशेषत: तुम्ही आंबा खूप प्रमाणात खाल्ल्यास त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.
6. संत्रे :
संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड आढळते, ज्यामुळे रात्री शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. यामुळे पोटात जळजळ आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, दिवसा फक्त जेव्हा तुमची पचनसंस्था सक्रिय असते तेव्हाच संत्र्याचे सेवन करा.
ही फळे खाणे का धोकादायक ?
संध्याकाळ आणि रात्री आपले शरीर मंदावते आणि पचनसंस्था सुद्धा तितकी सक्रिय राहात नाही. अशा परिस्थितीत आपण रात्री जड आणि साखरयुक्त फळे खातो तेव्हा त्याचा पचनावर परिणाम होतो. फळे बहुतेक कार्बोहायड्रेट्स आणि साखरेने भरलेली असतात, जी रात्री नीट पचत नाहीत. त्यामुळे पोटात गॅस, अपचन आणि अवेळी वजन वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.
काय करावे ?
रात्री हलकी आणि पचायला सहज असणारी फळे खायला हवीत, जसे की सफरचंद, पपई किंवा बेरी. या फळांमध्ये फायबर आणि पोषक तत्व असतात, जे रात्रीच्या वेळी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. याशिवाय रात्रीच्या जेवणापूर्वी पाण्याचे सेवन करणे देखील चांगले असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
हेही वाचा : Health Tips : ही आहेत महिलांमध्ये कॅल्शिअम कमी असल्याची लक्षणे
संपादन- तन्वी गुंडये
Comments are closed.