Boxing Day : ख्रिसमस नंतरच्या दिवसाला का म्हणतात बॉक्सिंग डे?

ख्रिसमस साजरा झाल्यानंतरच्या दिवसाची सकाळ ही बॉक्सिंग डे म्हणून ओळखली जाते. अनेक लोकांना हे आधीपासूनच ठाऊक असेल. विशेषत: ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांना बॉक्सिंग डेची सकाळ जास्त लक्षात असेल. पण ख्रिसमसच्या नंतरच्या सकाळला म्हणजेच 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे का म्हणतात? हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज आपण जाणून घेऊयात की 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे का म्हणतात याविषयी.

187 वर्षांपूर्वी सुरू झाली परंपरा :

होय, ही परंपरा अजिबात नवीन नाही, थोडेसे भूतकाळात गेल्यावर आपल्या लक्षात येते की ही परंपरा 187 वर्षे जुनी आहे. बॉक्सिंग डे साजरा करण्याची परंपरा ब्रिटनपासून सुरू झाली. व्हिक्टोरिया राणीच्या काळात श्रीमंत लोक ख्रिसमसच्या निमित्ताने भेटवस्तू बॉक्समध्ये ठेवत असत. आणि या भेटवस्तू हे आपल्या कर्मचाऱ्यांना वाटत. बॉक्समध्ये भेटवस्तू ठेवल्या जात असल्यामुळे या दिवसाला बॉक्सिंग डे असं नाव देण्यात आले.

– जाहिरात –

यासाठीदेखील म्हटलं जातं बॉक्सिंग डे :

इतर अनेक कारणांमुळे देखील ख्रिसमसनंतरच्या सकाळला ‘बॉक्सिंग डे’ असं नाव देण्यात आलं. ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी चर्चमध्ये एक बॉक्स ठेवला जातो. लोकांमध्ये वाटण्यासाठी अनेक प्रकारच्या भेटवस्तू या बॉक्समध्ये ठेवल्या जातात. या भेटवस्तू 26 डिसेंबर रोजी लोकांमध्ये वितरित केल्या जातात. त्यामुळे हा दिवस बॉक्सिंग डे म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाला ‘सेंट स्टीफन डे’ असेही म्हणतात.

सेंट स्टीफन गरीबांना मदत करण्यासाठी ओळखले जात होते. सेंट स्टीफनने लहान मुलांसाठी आणि गरिबांसाठी भेटवस्तू एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या आणि ख्रिसमसच्या पुढच्या सकाळी त्यांचे वितरण केले. म्हणूनच याला ‘बॉक्सिंग डे’ असेही म्हणतात.

– जाहिरात –

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ या दिवशी खेळतो कसोटी सामना

दरवर्षी बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ एक कसोटी सामना खेळतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ 1948 पासून या दिवशी कसोटी सामने खेळत आला आहे.
हा कसोटी सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणून ओळखला जातो. आजही ऑस्ट्रेलियन संघ भारतीय क्रिकेट संघासोबत कसोटी सामने खेळत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा कसोटी सामना खेळला जात आहे.

हेही वाचा : Christmas 2024 : मुंबईसह देशात नाताळ उत्साहात साजरा


संपादन- तन्वी गुंडये

Comments are closed.