Winter Fashion Tips : परफेक्ट स्वेटर असा निवडा

डिसेंबर महिना सुरू आहे, अशा परिस्थितीत सर्वजण फिरायला, पिकनिकला बाहेर पडत आहेत. या ऋतूत लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी तसेच स्टायलिश दिसण्यासाठी लोकरीचे कलेक्शन खरेदी करतात. या हंगामात महिला आणि पुरुष चांगले स्वेटर खरेदी करतात.

स्वेटर स्वस्त ते महाग अशा सर्व रेंजमध्ये उपलब्ध असले तरी काही वेळा निष्काळजीपणामुळे आणि योग्य माहिती नसल्यामुळे आपण हलक्या दर्जाचे स्वेटर खरेदी करतो. यामुळे पैसा तर वाया जातोच पण हिवाळ्यातील त्रासालाही सामोरे जावे लागते.

– जाहिरात –

यामुळे आज काही अशा टिप्स जाणून घेऊयात ज्याचे पालन करून तुम्ही चांगला स्वेटर खरेदी करू शकता.

– जाहिरात –

दर्जा चांगला असायला हवा :

अनेकदा आपण भारीतले स्वेटर खरेदी करतो, पण ते आपल्याला थंडीपासून वाचवत नाहीत. हे त्याच्या कमी दर्जाच्या गुणवत्तेमुळे घडते. अशा परिस्थितीत, नेहमी स्वेटरच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. चांगल्या दर्जाचे स्वेटर पातळ असू शकते परंतु तरीही ते थंडीपासून संरक्षण करू शकते.

फॅब्रिकची काळजी घ्या :

स्वेटर केवळ लोकरीपासून बनलेले नसतात. वेगवेगळ्या स्वेटरमध्ये वेगवेगळे फॅब्रिक्स असतात. थंडीपासून संरक्षणासाठी लोकर चांगली असते, तर काश्मिरी हलकी आणि मऊ असते. जर तुम्ही हलके स्वेटर शोधत असाल, तर कॉटन किंवा ॲक्रेलिक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हिवाळ्यातील फॅशन टिप्स : परिपूर्ण स्वेटर निवडा

साइज योग्य असणे गरजेचे :

स्वेटरचा आकार नेहमी योग्य असावा. ते खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे. स्वेटरचा आकार तुमच्या शरीराच्या आकारानुसार असावा जेणेकरून तुम्हाला त्यात कम्फर्टेबल वाटू शकेल. जर ते घट्ट असेल तर ते तुम्हाला त्रास देऊ शकते, परंतु जर ते सैल असेल तर ते तुमचे थंडीपासून संरक्षण करू शकणार नाही.

स्वेटर खरेदी करताना त्याच्या प्रकाराकडे द्या विशेष लक्ष :

जर तुम्हाला ट्रेंडी लूक हवा असेल तर फिट किंवा स्लिम कट निवडा, आणि जर कॅज्युअल किंवा कम्फर्टेबल लूक हवा असेल तर रॅगलन किंवा ओव्हरसाइज स्वेटर निवडा. प्रत्येक प्रकारचे स्वेटर घालण्याची पद्धत आणि स्टाईल वेगळी असते.

ब्रँडकडेही द्या लक्ष :

चांगल्या ब्रँडचे स्वेटर गुणवत्तापूर्ण आणि कम्फर्टेबल असतात परंतु तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडा. महाग स्वेटर नेहमच उच्च दर्जाचे असतीलच असे नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही एक उत्तम स्वेटर खरेदी करू शकता, जो केवळ आरामदायकच नाही तर स्टायलिश देखील असेल.’

हेही वाचा : Fashion Tips : टर्टलनेक ब्लाउजचा नवा ट्रेंड


संपादन- तन्वी गुंडये

Comments are closed.