Health Tips : सांधेदुखीवर हे ऑईल सर्वोत्तम
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे बऱ्याच लोकांना सांधेदुखीची समस्यांना सामोरे जावे लागते. सांधेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. जी वाढत्या वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे होऊ शकते. तुम्ही नैसर्गिकरित्या सांधेदुखीचा त्रास कमी करू शकता. काही विशिष्ट तेलं सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात आणि स्नायूंना आराम देतात. सांधेदुखी कमी करण्यासाठी काही नैसर्गिक तेलं उपयोगी ठरू शकतात. ही तेलं सांधेदुखी कमी करण्यात प्रभावी मानली जातात. आज आपण जाणून घेऊयात, सांधेदुखीसाठी कोणतं तेल सर्वोत्तम आहे.
निलगिरी तेल
निलगिरी तेल लावल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. वेदना कमी करण्यासाठी हे तेल खूप उपयुक्त आहे.
– जाहिरात –
कापूर तेल
रक्ताभिसरण सुधारण्यास कापूर तेल खूप उपयोगी आहे. हे स्नायू व सांधे शिथिल करण्यास मदत करते. तुम्ही हे तेल खोबरेल तेलात मिक्स करून मालिश करू शकता.
आल्याचे तेल
सूज आणि वेदना कमी करण्यासाठी जळजळ, वेदना, संधिवात, मळमळ इत्यादींवर उपचार करण्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी तेलांपैकी एक तेल म्हणजे आल्याचे तेल. हे तेल तुम्ही कोमट करून सांध्यांना लावू शकता.
– जाहिरात –
खोबरेल तेल
नाभीला खोबरेल तेल लावल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि सांधेदुखी कमी होते. खोबरेल तेलातील सूज कमी करण्याचे गुणधर्म शरीरातील वेदना कमी करतात. तसेच, स्नायूंना आराम मिळतो आणि शरीर अधिक हलके वाटते. हा उपाय विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभावी ठरतो.
ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह तेलामध्ये अँटी इंफ्लामेंट्रीचे गुणधर्म असतात. जे संधिवात आणि हाडांच्या समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑइल नियमित सांध्यांना लावल्याने सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा : Health Tips : हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे
संपादन : प्राची मांजरेकर
Comments are closed.