Health Tips : वर्कआऊटनंतर स्ट्रेचिंग यासाठी आहे गरजेचे

वर्कआउट रूटीनमध्ये ज्या गोष्टींकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते ती म्हणजे स्ट्रेचिंग. अनेकदा लोक स्ट्रेचिंग करत नाहीत. त्याच वेळी, काही लोकांना वर्कआउट रूटीननंतर फक्त कूलडाउन म्हणून स्ट्रेचिंग करायला आवडते, परंतु स्ट्रेचिंग हे कूलडाऊन पेक्षाही अधिक काही आहे. प्रत्येकाने व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायूंना आराम देण्यास आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत होऊ शकते. स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला वर्कआउट केल्यानंतर शरीराच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो.

स्ट्रेचिंगमुळे स्नायूंची लवचिकता सुधारते, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता देखील कमी होते. त्याच वेळी, आपल्या मूव्हमेंट्सही फास्ट होऊ लागतात. वर्कआऊटनंतर स्ट्रेचिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठीच आज या लेखात जाणून घेऊयात वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंग केल्याने कोणते फायदे मिळू शकतात याविषयी.

स्नायूंना आराम द्या :

स्ट्रेचिंग हा व्यायामानंतर स्नायूंना आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा स्नायू घट्ट जाणवू लागतात.परंतु जेव्हा आपण स्ट्रेचिंग करतो तेव्हा स्नायूंना आराम मिळतो आणि लवचिकता देखील वाढते, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.

कसरतीमुळे होणाऱ्या वेदना कमी होतात:

वर्कआउट केल्यानंतर आपले अवयव दुखणे ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्या सर्वांना भेडसावत असते. तुम्हाला असे वाटत असेल की वर्कआऊट केल्यावर दुसऱ्या-दोन दिवसांत शरीरात खूप वेदना आणि घट्टपणा जाणवतो. वर्कआऊटनंतर स्नायूंमध्ये होणारा हा त्रास आहे. पण जेव्हा तुम्ही वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचिंग करता तेव्हा याचा तुम्हाला खूप फायदा होतात. यामागील कारण असे की, स्ट्रेचिंमुळे रक्त प्रवाह वाढू शकतो आणि तुमच्या स्नायूंना आराम मिळून
वेदना कमी होऊ शकतात.

शरीराची स्थिती सुधारते:

तुम्हाला कदाचित हे माहित नसेल पण स्ट्रेचिंगचा तुमच्या शरीराच्या स्थितीवरही मोठा परिणाम होत असतो. जर तुमच्या स्नायूंमध्ये घट्टपणा असेल तर त्यामुळे तुमचे बॉडी पोश्चर बिघडू शकते. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता तेव्हा तुमच्या खांद्याचा, मानाचा आणि पाठीच्या भागावर ताण निर्माण होतो. अशा प्रकारे तुमचे ब़़ॉ़डी पोश्चर सुधारते आणि चुकीच्या आसनामुळे होणाऱ्या वेदनाही फारशा जाणवत नाहीत.

दुखापतींना प्रतिबंध करते :

स्ट्रेचिंगमुळे दुखापत होण्याची शक्यताही कमी होते. खरं तर, जेव्हा स्नायू घट्ट असतात तेव्हा त्यांना दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. या स्थितीत ताण किंवा खेचणे इत्यादीची शक्यता असते. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता तेव्हा त्यामुळे स्नायूंची लवचिकता सुधारते आणि तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय रोजच्या हालचाली करू शकता.

बॉडी मूव्हमेंट्स सुधारतात :

स्ट्रेचिंगमुळे शरीराच्या हालचालींमध्येही सुधारणा होते. जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता तेव्हा तुम्ही तुमचे शरीर ताणत असता. यामुळे, जेव्हा तुम्ही नंतर व्यायाम करता तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही खोल स्क्वॉट्स किंवा पायाच्या बोटाला स्पर्श करणे यासारखे व्यायाम तुम्ही अधिक आरामात करू शकता. अशाप्रकारे, कालांतराने तुमचे शरीर अधिक लवचिक बनते.

हेही वाचा : Beauty Tips : ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किनसाठी हे तेल उत्तम


संपादन- तन्वी गुंडये

Comments are closed.