आरोग्य टिप्स : तुम्हीही वारंवार डोळे चोळता का?
आपल्यापैकी अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. डोळ्याला खाज येणे, डोळ्यांत काही गेल्यावर किंवा इतर काही समस्यांमुळे डोळे चोळावे लागतात. पण, वारंवार डोळे चोळण्याची सवय महागात पडू शकते. खरं तर, संसर्ग, ऍलर्जी आणि डोळ्यांच्या समस्यांशी समस्यांमुळे वारंवार डोळे चोळावे लागतात. आरोग्य तज्ञांच्या मते, डोळे चोळणे टाळायला हवे. जाणून घेऊयात, वारंवार डोळे चोळल्याने काय परिणाम होतात.
रक्तवाहिन्यांवर होतो परिणाम –
डोळ्यांतील धमन्या नाजूक असतात. त्या डोळ्यातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत करतात. अशा स्थितीत तुम्ही जर वारंवार डोळे चोळलेत तर रक्तवाहिन्या तुटण्याची शक्यता असते आणि डोळ्यांमध्ये लाल रक्त जमा होऊ लागते. ज्यामुळे डोळ्यातील पांढरा थर खराब होतो.
कॉर्निया होतो खराब –
तज्ञांच्या मते, डोळे वारंवार चोळल्याने कॉर्नियावर ओरखडे येण्याची शक्यता असते. ज्याचा गंभीर परिणाम म्हणजे तुम्हाला अंधत्व येऊ शकते.
डार्क सर्कलची समस्या –
डोळे सतत चोळल्याने डोळ्यांखालील डार्क सर्कलची समस्या सुरू होते. विशेष करून ज्यांची त्वचा गडद रंगाची आहे, त्यांना ही समस्या जाणवते.
डोळे लाल होणे –
डोळ्यांना जास्त वेळ चोळल्याने डोळे लाल होतात. खरं तर, असे केल्याने केशिका फुटू शकता आणि डोळ्यांमध्ये जखमा होऊ शकतात.
इन्फेक्शन, ऍलर्जीची समस्या –
डोळे चोळताना आपण वारंवार डोळ्यांना हाताने स्पर्श करतो. हातावर असंख्य बॅक्टेरिया असतात. जे आपल्या हातावाटे डोळ्यांमध्ये जाऊ शकतात. ज्यामुळे इन्फेक्शन, ऍलर्जीची समस्या निर्माण होते.
हेही पाहा –
Comments are closed.