मोनाली ठाकूर : गायिका मोनाली ठाकूरने आजारपणाच्या अफवांवर मौन बाळगले आहे

बॉलिवूड संगीत विश्वातील नामांकित गायिका मोनाली ठाकूरच्या आवाजाची जादू प्रत्येक वयोगटात पहायला मिळते. अशा कर्णमधुर गायिकेच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. पण, हा शो सुरु असताना अचानक मोनालीची तब्येत बिघडली. लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान तिला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली आणि तिची तब्येत खालावली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, गायिकेची प्रकृती बरीच नाजूक वाटत होती. ज्यामुळे तडक कॉन्सर्ट थांबवला गेला. मात्र, खुद्द मोनालीने तिच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

मोनाली ठाकुरची सोशल मीडिया पोस्ट

गायिका मोनाली ठाकूरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतःची हेल्थ अपडेट दिली आहे. इतकेच नवे तर रुग्णालयात भरती नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘माझ्या तब्येतीसंदर्भात कोणत्याही चुकीच्या बातम्या शेअर करू नका. मी सर्वांचे प्रेम आणि काळजीसाठी आभार मानते. मात्र, मला हे सांगणे आवश्यक आहे की मला श्वास घेण्यात कोणतीही अडचण येत नसून मी अगदी ठीक आहे. तसेच मला कोणत्याही रुग्णालयात भरती केलेले नाही. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे’.

पुढे लिहिलंय, ‘मला नुकतेच व्हायरल इन्फेक्शन झाले होते. ज्यातून मी अजून पूर्ण बरी न झाल्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते. आजारपणातून पूर्ण बरी न झाल्यामुळे मला पुन्हा व्हायरलचा त्रास होतो आहे. फ्लाइट्स दरम्यान मला सीरियस साइनस आणि मायग्रेनमूळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. बस इतकीच गोष्ट आहे. आता मी मुंबईत परत आले आहे आणि उपचार घेतेय. आराम करतेय आणि लवकरच बरी होईन. मी काही काळात पूर्णपणे ठणठणीत होईन’.

आतापर्यंत अनेक गायकांना लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक तब्येत बिघडल्याचा अनुभव आला आहे. दिवंगत गायक के.के. यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना श्वास घेण्यास अडचण आली आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेमुळे जेव्हा मोनाली ठाकूरची तब्येत बिघडल्याचे वृत्त आले तेव्हा चाहते चिंतेत पडले होते. मात्र, गायिकेने स्वतःच दिलेल्या हेल्थ अपडेटमुळे आता चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

हेही पाहा –

Comments are closed.