Kitchen Tips : पराठे लाटताना फाटतात? मग वापराव्यात या टिप्स

टिफिनमध्ये किंवा सकाळ-संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी कित्येक घरात पराठे बनवले जातात. प्रवासासाठी अनेकदा पराठे बनवून कॅरी केले जातात. स्टफ पराठा हा खव्वयांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मात्र, कित्येकदा पराठे बनवताना फाटतात, त्यातील सारण बाहेर येते. कधीकधी पराठे कडक, खडबडीत किंवा कोरडेच होतात. ज्यामुळे पराठे खाण्याचा मूड निघून जातो. अशावेळी तुम्ही पराठे बनवण्याच्या प्रोसेसकडे लक्ष द्यायला हवे. कारण पीठ मळण्यापासून ते भाजण्यापर्यतच्या स्टेप महत्वाच्या असतात. तुम्हालाही पराठे मऊ, फल्फी हवे असतील तर पुढील स्टेप्स नक्की वापरा.

  • पराठे लाटताना फाटत असतील तर पीठ भिजवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पराठ्याची कणिक सैल झाली तर पराठा लाटताना फाटू शकतो. अशावेळी पराठा लाटण्यापूर्वी स्टफ केल्यावर हातावर थोडा थापावा आणि नंतर पराठे लाटावेत.
  • पराठा लाटताना त्याच्या कडा थोड्या जाडसर ठेवाव्यात. पराठ्याच्या कडा जाडसर ठेवल्याने स्टफिंग बाहेर येत नाही.
  • पराठ्याचं पीठ मळताना व पराठा लाटताना मैद्याचा वापर करावा. मैद्यामुळे पराठा फूटत नाही, पूर्ण मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पीठात मैदा मिक्स करू शकता.
  • पराठ्याचे स्टफिंग अर्थात सारण बनवताना कांदा, भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. या टिपमुळे कांद्याचे सारण लाटताना मध्ये येत नाही आणि पराठा फाटत नाही.

  • काहींना पराठ्यात स्टफिंग केल्यावर लगेच लाटायची सवय असते. मात्र, असे केल्याने पराठा फाटू शकतो. अशावेळी पराठा हातावर थोडा थापावा आणि लाटण्यास सुरुवात करावी.
  • परफेक्ट पराठ्यासाठी लाटणे, स्टफिंग आणि त्यासोबत पराठा भाजणे देखील गरजेचे आहे. पराठा केवळ बाहेरूनच नाही तर आतून व्यवस्थित शिजणे आवश्यक आहे.
  • पराठा भाजताना एका बाजूने शेकावा. त्यानंतर दुसरी बाजू भाजावी. या ट्रिकने पराठ्यातील सारण घट्ट होते आणि व्यवस्थित फुलतात.
  • तु्म्ही वरील सर्व सोप्या टिप्स पराठे बनवताना वापरल्यात तर पराठे नक्कीच फल्फी, मऊ होतील.

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.