Stress Relief : स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काय करावे?
दिवसेंदिवस मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. मानसिक आजारांमुळे लोकांमध्ये निराशा वाढत आहे. धावपळीच्या या जगात स्ट्रेस तर रोजच्या रुटीनचा एक भाग झाला आहे. स्पर्धेच्या या युगात आपणही टिकावे यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाच्या नादात मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्ट्रेसमुळे अनेक शारीरिक, मानसिक आजार होत आहेत. व्यक्तींचे जगणे अवघड झाले आहे. अशावेळी निरोगी राहण्यासाठी स्ट्रेसपासून दूर राहणे गरजेचे आहे. स्वत:पासून स्ट्रेस दूर ठेवणे वाटते तितके अवघड नाही. तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये काही बदल केल्यास हे नक्कीच सहज शक्य आहे.
- शारीरिक आणि मानसिक स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी सर्वात सोपा मार्ग योगाचा सराव करणे सांगितले जाते. योगाच्या सरावाने केवळ मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यास फायदा होतो.
- योगाप्रमाणेच ध्यानही करता येते. रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ध्यान केल्याने मानसिक आरोग्य सुधारते.
- संशोधनानुसार, निरोगी खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे हेल्दी खावे. जंक फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
- स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, नट्स, ताज्या फळांचा समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमिन्स, आयर्न्स आढळतात, ज्याद्वारे स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते.
- चहाने फ्रेश वाटते हे खरं आहे. पण, आरोग्यासाठी दुधाचा चहा हानिकारक असतो. तुम्ही चहाऐवजी ग्रीन टी, हर्बल टी चे सेवन करावे. या चहा प्यायल्याने स्ट्रेस कमी होतो.
- पाण्याच्या कमतरतेमुळे स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळे स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी रोज किमान 3 लिटर पाणी प्यावे.
- वाढता स्क्रीनटाइम म्हणजेच मोबाईल आणि सोशल मीडियाच्या या जगात स्ट्रेस लहानांपासून-मोठ्यांपर्यत सर्वानाच जाणवत आहे. त्यामुळे स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी मोबाइल, टिव्ही राहा.
हेही पाहा –
Comments are closed.