Clothes Washing Tips : महागडे कपडे घरी कसे धुवायचे?

लग्न किंवा कोणत्याही समारंभात उठून दिसावं यासाठी महागडे, हेवी कपड्यांची निवड केली जाते. महागड्या साड्या, शरारा, कुर्ता एकदा वापरल्यावर त्याचा रंग जाऊ नये, पोत खराब होऊ नये. यासाठी असे कपडे ड्रायक्लीनिंग केले जातात. सध्याच्या घडीला एक साडी ड्रायक्लींनिंग करायची म्हटलं की, 100 ते 200 रुपचे खर्च होतात. त्यामुळे अनेक महिला महागडे कपडे घरीच धुतात. पण, महागडे कपडे योग्य पद्धतीने न धुतल्यास त्यांची गुणवत्ता आणि रंग खराब होतो. अशावेळी महागडे कपडे धुताना खराब होण्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • प्रत्येक महागड्या कपड्यांवर वॉशिंग इंस्ट्रक्शन दिलेले असते. तुम्ही जर कपडे व्यवस्थित पाहिले तर कपड्यांच्या लेबलवर यासंदर्भात माहिती दिलेली असते.
  • कपडे कसे धुवायचे, याबद्दलच्या सुचना दिलेल्या असतात. काही कपडे हलक्या हाताने धुवायचे असतात तर काही कपड्यांसाठी ड्राय क्लीनिंगची आवश्यकता असते. त्यामुळे महागडे, हेवी कपडे धुण्यापूर्वी त्यावर दिलेले वॉशिंग इंस्ट्रक्शन अवश्य वाचावेत.
  • महागडे कपडे धुताना हार्श डिटर्जंट वापरू नये. बाजारात महागड्या कपड्यांसाठी खास डिटर्जंट मिळतात. या डिटर्जंटमुळे कपडे धुतल्याने खराब होत नाही. कपड्यांचा रंगही जात नाही.
  • वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे सोयिस्कर असल्याने मशीनमध्ये कपडे धुतले जातात. पण, सर्वच कपडे मशीनमध्ये धुणे योग्य नाही. काही कपड्यांवर स्पष्टपणे मशीनमध्ये धुवू नये, असे लिहिलेले असते. कपडे खराब करायचे नसतील तर त्यावरील सुचना वाचणे आवश्यक आहे.
  • मशीनमध्ये कपडे धुणार असाल तर मशीनची सेंटिग्ज योग्य निवडावी. यामुळे महागडे, हेवी कपडे खराब होत नाही.
  • कपडे मशीनमध्ये धुताना उलटे करून धुवावेत. असे केल्याने कपडे एकमेकांवर घासत नाही आणि खराब होत नाही.
  • महागडे कपडे खराब होऊ नये असे वाटत असेल तर कपडे हाताने धुणे फायद्याचे ठरेल.
  • कपड्यांवर डाग पडले असतील तर त्वरीत स्वच्छ करावा. डाग बराच काळ तसेच ठेवल्यावर काढणे कठीण होते.
  • रेशीम, लोकर आदी महागड्या कपड्यांना इस्त्री करताना काळजी घ्यावी. जास्त गरम इस्त्री कपड्यांसाठी वापरू नये.
  • प्रत्येक कापडासाठी इस्त्रीची वेगळी सेंटिग असते. या सेंटिगमुळे कपड्यांचा पोत आणि रंग खराब होत नाही.
  • जाळीगार कपडे मशीनमध्ये थेट धुवू नये. असे कपडे धुण्याच्या पिशवीत कपडे ठेवून धुवावेत.

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.