Health Tips : हे हेल्दी फूड्स मुधमेह रुग्णांसाठी धोकादायक

बऱ्याचदा हेल्दी वाटणारे काही अन्नपदार्थ मधुमेह असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेह रुग्णांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यामागचं कारण म्हणजे चुकीच्या हेल्दी फूड्समुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी योग्य अन्नाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. आज आपण जाऊन घेऊयात मुधमेह रुग्णांसाठी कोणते हेल्दी फूड्स धोकादायक ठरू शकते.

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस हा हेल्दी आणि नैसर्गिक असला तरीही यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते आणि फायबर कमी असते ज्यामुळे ब्लड शुगर पटकन वाढू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना संत्र्याचा रस पिणे टाळणे चांगले.

तपकिरी ब्रेड

संपूर्ण गव्हाचा ब्रेड हा हेल्दी वाटू शकतो. परंतु यामध्ये रिफाइन्ड पीठ आणि साखर असते, जे रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते.

लो-फॅट योगर्ट

लो-फॅट योगर्टमध्ये चव वाढवण्यासाठी यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता वाढते.

ऊर्जा पेय

व्यायामानंतर बऱ्याचदा आपण एनर्जी ड्रिंक्स किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स घेतो. व्यायामानंतर हे हेल्दी वाटणारे या ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरली जाते. जी मधुमेह असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.

बटाट्याचे पदार्थ

हेल्दी वाटणारा या बटाट्यामध्ये हाय-ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आढळतो. त्यामुळे जास्त तळलेले किंवा उकडलेले बटाटे साखर वाढवू शकतात.

मध आणि गूळ

मधुमेह असलेल्या लोकांनी मध आणि गूळ खाणे टाळावे. मध आणि गूळ नैसर्गिक गोड पदार्थ आहे. जे रक्तातील साखर वाढवते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

  • कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडा.
  • फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खा.
  • साखरयुक्त पदार्थ टाळा
  • तुमच्या डायटमध्ये कोणते बदल करावेत हे डॉक्टरांशी सल्लामसलत करून ठरवावे.

हेही वाचा : Health Tips : वेट मेंन्टेन ठेवायचंय? मग डिनरनंतर फॉलो करा या सवयी


द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर

Comments are closed.