Summer Fashion : समर लूकसाठी कूल स्कर्ट

जर उन्हाळ्यात तुम्हाला फॅशनेबल दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या फॅशनमध्ये काही बदल करू शकता. उन्हाळ्यात कपडे निवडताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते यामागचं कारण म्हणजे उन्हाळयात आपण फुल हॅन्डचे कपडे घालत, या अशा कपड्यांमुळे जास्त गरम होते. त्यामुळे या ऋतूमध्ये आरामदायी आणि जास्त गरम होणार नाही अशा कपड्यांची तुम्ही निवड करू शकता. तसेच या दिवसात तुम्ही काही सुंदर आणि स्टायलिश कपड्यांची निवड करू शकता.

फडफड स्कर्ट

तुम्ही दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर प्रमाणे उन्हाळ्यात या प्रकारचा फ्लेर्ड स्कर्ट घालू शकता. यांना फ्लेअर स्कर्ट म्हणतात. हे स्कर्ट तुम्हाला विविध कापडांमध्ये आणि डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.

डेनिम स्कर्ट

उन्हाळ्यात तुम्ही या प्रकारचे सुंदर डेनिम स्कर्टस घालू शकता. हे स्कर्टस खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतात. हे फॅब्रिक असे आहे की तुम्हाला घाम येणार नाही. तुम्ही कॉलेजला ऑफिसला किंवा फिरायला जाताना तुम्ही हा डेनिम स्कर्टस घालू शकता.

प्लॅटिड स्कर्ट

तुम्ही आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण प्रमाणे उन्हाळ्यात या प्रकारचे डिझाइन केलेले प्लेटेड स्कर्ट घालू शकता. हे स्कर्टस तुम्हाला लॉन्ग आणि शॉट असे दोन्ही पर्याय तुम्हाला यामध्ये मिळतील.

स्टेटमेंट स्कर्ट

प्रत्येक उन्हाळ्यात स्टेटमेंट स्कर्टची फॅशन येते. ही डिझाईन खूप लोकप्रिय होत आहे. जर तुम्हाला काही हटके ट्राय करायचं असेल तर तर स्कर्टची ही डिझाइन तुमच्यासाठी योग्य आहे.जॅकलिन फर्नांडिस आणि प्रियांका चोप्रा प्रमाणे, तुम्ही देखील हे स्कर्ट वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कॅरी करू शकता.

हेही वाचा : Fashion Tips : ऑफिस इव्हेंटसाठी परफेक्ट साडी


द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर

Comments are closed.