Healthy Sleep Habits : रात्री गाढ झोप लागण्यासाठी सोप्या टिप्स
झोपेच्या अभावामुळे आपल्या शरीराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपली मनःस्थिती, विचार करण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती, हृदयाचे आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या सगळ्याच घटकांवर झोपेच्या अभावाचा परिणाम होत असतो.अशा परिस्थितीत, कधीकधी तुम्हाला या सर्व घटकांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण होते. निरोगी आहार आणि दैनंदिन व्यायामाप्रमाणेच, रात्रीची चांगली झोप देखील तुमच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. तुमच्या झोपेच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. परंतु तुमच्या दैनंदिन व्यवहारात थोड्याफार प्रमाणात बदल करून तुम्ही तुमच्या झोपेवर नियंत्रण मिळवू शकता. याकरताच जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स.
तुमच्या कॅफिनच्या सेवनाबद्दल काळजी घ्या :
जास्त कॅफिनचे सेवन केल्याने तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कॅफिनचे सेवन अजिबात करू नका. जर तुम्हाला चहा किंवा कॉफी प्यायची असेल तर तुम्ही दिवसभरात पिऊ शकता. परंतु रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी घेणे कटाक्षाने टाळावे.
निश्चित वेळ ठेवा :
रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक वेळ निश्चित करा. नेहमी एकाच वेळी झोपण्याचा आणि जागे होण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराला वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय लागेल. यासोबतच, रात्री किमान 7 ते 8 तास झोप घ्या.
मेलाटोनिन पूरक आहार:
मेलाटोनिन सप्लिमेंट्स झोपेची गुणवत्ता वाढविण्यास मदत करू शकतात. मेलाटोनिन हे मेंदूद्वारे तयार होणारे एक संप्रेरक आहे. आपला मेंदू अंधारात मेलाटोनिन तयार करत असतो. मेलाटोनिन घटक असणारी औषधे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.
नियमित व्यायाम:
नियमित व्यायाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. व्यायामामुळे तुम्हाला झोप येण्यास देखील मदत होऊ शकते. व्यायामामुळे हार्मोन्सची पातळी संतुलित होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
ताण कमी करा :
ताण तुमच्या मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही हानिकारक ठरतो. याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो. यासाठीच ताण न घेता स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा : Fashion Tips : उन्हाळ्यासाठी परफेक्ट बॉलीवूड स्टाइल कुर्तीज्
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.