Beauty Tips : योग्य कंडीशनर कसा निवडायचा?
आपले केस निरोगी, मऊ आणि चमकदार राहण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्ट्स वापरतो. शॅम्पूइतकाच योग्य कंडीशनर निवडणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या केसांची रचना, प्रकार आणि गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे योग्य कंडीशनर निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठवणे अत्यंत गरजेचं आहे. चुकीच्या कंडीशनरमुळे आपली केस खराब होऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात योग्य कंडीशनरची निवड कशी करावी.
पातळ कसे
केस पातळ होण्याची दोन कारणे असू शकतात, एकतर केसांना योग्य उपचार दिले जात नाहीत किंवा अनुवांशिकतेमुळे केसांचा पोत पातळ होऊ शकतो. परंतु योग्य उपचारांनी हे काही प्रमाणात दुरुस्त करता येते. विशेषतः हलके आणि व्हॉल्यूमाइजिंग फॉर्म्युला असलेले कंडिशनर अशा केसांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अशा केसांसाठी कंडिशनर निवडताना, त्यात बायोटिन, कॅफिन, पॅन्थेनॉल आणि अमोनिया अॅसिड सारखे घटक वापरलेले नाहीत याची खात्री करा. तसेच जास्त केमिकयुक्त कंडिशनर वापरू नका याने केस अजून पातळ होतील.
सामान्य
जर तुमची केस नॉर्मल असतील तर अशा केसांची देखभाल करण्यासाठी, हायड्रेशन पातळीमध्ये संतुलन राखणे महत्वाचे आहे. केसांची चांगली निगा राखण्यासाठी केसांसाठी, जीवनसत्त्वे अ, क आणि ई असलेले कंडिशनर वापरू शकता. याव्यतिरिक्त, निलगिरी गव्हाचे प्रथिने असलेले कंडिशनर देखील वापरू शकता.
कुरळे केस
कुरळ्या केसांवर फक्त मॉइश्चरायझिंग कंडिशनर लावावे असे कंडिशनर केसांना चमक आणि पोषण देतात.अशा केसांसाठी कंडिशनर निवडताना, त्यातील घटकांमध्ये प्रथिने असल्याची खात्री करा. याशिवाय, शिया बटर, ऑलिव्ह ऑइल आणि ग्लिसरीन असलेले कंडिशनर देखील अशा केसांसाठी फायदेशीर ठरतात. हे केसांना हायड्रेशन देण्याचे काम करते.
लांब केस
जर तुमची केस लांब आणि जाड असतील तर अशा केसांसाठी एवोकॅडो आणि सोया मिल्क सारखे घटक असलेल्या कंडीशनरची निवड करा. यामुळे केस चांगली आणि मजबूत राहतील.
तेलकट केस
जर तुमची केस वारंवार तेलकट होत असतील तर अशा केसांसाठी ब्लू ॲटलस कंडिशनर हा तेलकट केसांसाठी चांगला कंडिशनर आहे.
हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करणे योग्य आहे का ?
द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर
Comments are closed.