Hair Care : रात्री केस बांधून की मोकळे सोडून झोपावे?

केसांची काळजी घेणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे, विशेषतः रात्री झोपताना. रात्रीच्या वेळी केसांची योग्य काळजी घेतल्यास ते मजबूत, जाड आणि निरोगी राहू शकतात. अशा परिस्थितीत त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी, झोपताना केस कसे ठेवावे हे समजून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक याकडे लक्ष देत नाहीत, पण या सवयीचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. काही लोकांना झोपण्यापूर्वी केसांची वेणी बांधायला आवडते, तर काहींना केस मोकळे सोडून झोपायला आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोन्ही पद्धतींपैकी कोणती पद्धत तुमच्या केसांसाठी योग्य आहे? आजच्या या लेखातून जाणून घेऊयात की रात्री केस बांधून झोपावे की मोकळे सोडून.

केस मोकळे ठेवून झोपणे योग्य की अयोग्य?

जर तुम्ही केस मोकळे ठेवून झोपलात तर ते तुमच्या केसांसाठी फायदेशीर आणि हानिकारक दोन्ही असू शकते. विशेषतः जर तुमचे केस लांब आणि पातळ असतील तर ते झोपताना एकमेकांमध्ये गुंतू शकतात आणि त्यांच्या तुटण्याची शक्यता वाढू शकते. याउलट लहान केसांवर याचा फारसा परिणाम होत नाही. केस मोकळे ठेवल्याने डोक्यांतील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि ते मजबूत होतात.

केस बांधून झोपण्याचे फायदे

जर तुमचे केस लांब, जाड आणि मजबूत असतील तर झोपताना ते हलके बांधून ठेवणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे केस गळण्याची आणि केस तुटण्याची समस्या कमी होईल. रात्री केसांची हलकी वेणी घालून झोपल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.

रात्री केस बांधण्याची आणि मोकळे ठेवण्याची योग्य पद्धत

जर तुम्हाला केस मोकळे ठेवून झोपायचे असेल तर कापसाच्या उशीऐवजी रेशमी उशी वापरा. यामुळे केसांमधील कुरळेपणा कमी होईल आणि ते तुटणार नाहीत. जर तुम्ही केस बांधून झोपत असाल तर खूप घट्ट केसांचे रबर वापरू नका. यामुळे डोकेदुखी होऊ शकते आणि केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. केसांची वेणी सैल ठेवून झोपणे हा सर्वोत्तम मार्ग आहे जेणेकरून तुमच्या केसांची कमी गुंता निर्माण करतील आणि तुटण्यापासूनही वाचतील. हेही वाचा : Skin Care : बदलत्या ऋतुनुसार घ्या त्वचेची काळजी


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.