Bachendri Pal : माउंट एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला
समोरून येणाऱ्या आव्हानांवर जिवाची बाजी लावून विजय मिळवणारे अनेक माऊंटेनियर आपण बघितले असतील. पण असचं आव्हान पेलत त्यावर विजय मिळवला होता तो भारताच्या पहील्या महिला माऊंटेनियर बचेंद्री पाल यांनी. तब्बल 40 वर्षांपूर्वी बचेंद्री पाल यांनी 23 मे रोजी माउंट एवरेस्टवर आपलं पाऊल ठेवले होते. त्या माउंट एवरेस्टवर पाऊल ठेवणाऱ्या जगातील पाचव्या आणि भारतातील पहिल्या महिल्या ठरल्या आहेत. आजच्या तिची गोष्ट मधून जाणून घेऊयात, बचेंद्री पालविषयी काही खास गोष्टी,
सर्वत्र पांढरा शुभ्र बर्फ, सोसाट्याचा वारा, कमी प्रमाणात असलेला ऑक्सिजन आणि हिमस्खलनाची टांगती तलवार अशा अत्यंत बिकटच्या हवामानात माऊंट एवरेस्टवर पाय ठेवणारी पहिला भारतीय महिला म्हणजे बचेंद्री पाल यांच्यासाठी 23 मे 1984 हा दिवस खूप महत्त्वाचा होता. पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर म्हणजे माऊंट एवरेस्ट त्यांनी या दिवशी सर केले होते. समुद्र सपाटीपासून जवळपास 8848 फूट उंचीवर असलेले हे शिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी प्राणांची बाजी लावली. पण, या महिलेने ते जिद्दीने हे शिखर सर करत महिलांसाठी या क्षेत्रात मार्ग मोकळा करून दिला आहे.
बचेंद्री यांचा जन्म 24 मे 1954 मध्ये उत्तराखंड येथील गढवाल भागातील नाकुरी या छोट्याशा गावात झाला आहे. त्यांचे वडील हे शेतकरी होते. बी.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षिका म्हणून बचेंद्री पाल काम करत होत्या. पण, जन्मच उत्तराखंडच्या पर्वतरांगात झाल्याने बचेंद्री यांना लहानपणापासूनच पर्वत-शिखरांचा ओढा असायचा. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन गिर्यारोहण होण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला.
अशी झाली सुरुवात –
1984 मध्ये एवरेस्टवर जाण्यासाठी एक मोहिम पथक नेमण्यात आले होते. या गटाचे नाव 84 असे असल्याचे बोलले जाते. या गटात 11 पुरुष आणि 5 महिला होत्या. यात बचेंद्री पाल यांचा समावेश होता. अनेक अडथळे पार करत बचेंद्री यांनी अशक्य वाटणारे हे पर्वत शिखर सहजतेने पार करत महिला गिर्यारोहकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यासह एवरेस्टवर यशस्वीपणे चढाई केल्यानंतर त्यांनी गिर्यारोहणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या नॅशनल ऍडव्हेंचर फाउंडेशनमध्ये एक प्रशिक्षक बनल्या आहेत, जिथे गिर्यारोहकांना त्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहेत.
पुरस्कार
बचेंद्री पाल यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आतापर्यत त्यांना पद्मश्री, पद्मभुषण आणि अर्जुन पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार देण्यात आले आहेत.
हेही पाहा –
Comments are closed.