रुद्राक्ष वापरण्याचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय फायदे
भगवान शंकराला प्रिय असलेल्या रुद्राक्षाचे फक्त धार्मिक महत्व नसून अनेक आरोग्यदाय़ी फायदेही आहेत. यातील इलेक्ट्रोम्रॅग्नेटीक उर्जेमुळे ब्लड प्रेशर, ताण, तणावाबरोबरच इतर व्याधींमधूनही सुटका होते. असा दावा फ्लोरिडातील वैज्ञानिकांनी केला आहे.
रक्तदाब
पाणी भरलेल्या भांड्यात रात्रभर रुद्राक्ष मणी भिजवून ठेवावा आणि सकाळी अनुशापोटी ते पाणी पिल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. तसेच त्यामुळे हृदयाचे ठोकेही नियमित होतात.
मानसिक समस्या
संशोधनानुसार वेगवेगळ्या मुखाच्या रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रॉमॅग्निटीक उर्जा असते. ज्याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. यामुळेच आयुर्वेदामध्ये मानसिक व्याधींसाठी रुद्राक्षाला गुणकारी म्हटले जाते. रुद्राक्ष धाग्यात ओवून गळ्यात घातल्यास डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्या दूर होतात. तसेच स्मरमशक्तीही ,सुधारते.
तणाव
रुद्राक्षाची माळा गळ्यात घातल्याने मानसिक व्याधी, ड्रिप्रेशन कमी होते. रुद्राक्षातील इलेक्ट्रॉमॅग्निटीक शरीरातील न्युरोलॉजिकल सिस्टम बँलन्स करण्यात महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे तणावासाटी कारणीभूत असलेले कोर्टीसोल हार्मोन संतुलित राहते.
रक्तप्रवाह
रुद्राक्ष त्यातील विशेष गुणांमुळे चुंबकाचे काम करतो. त्यामुळे धमन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो. एवढेच नाही तर गळ्यात रुद्राक्ष घातल्याने अंगदुखीही दूर होते.
अँटी इन्फे्लमेटरी गुण
रुद्राक्ष माळेत अँटी इन्फे्लमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे रुद्राक्षाचे पाणी पिल्याने किंवा त्याची माळ गळ्यात घातल्याने शरीरावरील सूज उतरते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Comments are closed.