Women Health : वयानुसार महिलांचे वजन किती असावे?
वाढतं वजन हल्लीची एक सामान्य समस्या झाली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये वाढणाऱ्या वजनाची समस्या प्रकर्षाने जाणवते. एकीकडे वाढत्या वजनाने त्रस्त असणाऱ्या महिलांचा गट तर दुसरीकडे वजन न वाढणाऱ्या महिलांचा गट आहे. प्रश्न अनेक असले तरी त्या एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे वजन. अशावेळी निरोगी महिलेचं वजन किती असावे हा प्रश्न अनेकजणींना पडतो. कारण अनेक महिलांचे वजन वयोमानाने कमी तर कोणाचे जास्त असते. त्यामुळे आरोग्यतज्ञांच्या मते, आजच्या लेखात जाणून घेऊयात वयानुसार महिलांचे वजन किती असावे.
खरं तर भारतीय महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या खूप सामान्य झाली आहे. यामागची कारणे म्हणजे अस्वास्थकर जीवनशैली, हार्मोनल बदल, कमी शारीरिक हालचाली, पोषणयुक्त आहाराचा अभाव, तळलेले अन्न खाणे. याशिवाय प्रसुतीनंतर वजन हे सुद्धा कारण आहे. अशापरिस्थितीत, वजन नियंत्रणात ठेवणे कठीण असते. वजन मोजण्यासाठी वैद्यकीय शास्त्रात बीएमआय (Body Mask Index) सुत्र वापरले जाते. पण, लहान मुलांचे वजन या सुत्राने मोजले जात नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
वजन मोजण्याची पद्धत –
डायटीशियनुसार, उंचीनुसार वजन मोजले जाऊ शकते. यासाठी फक्त तुम्हाला उंची सेंटीमीटरमध्ये मोजावी लागेल. तुम्ही एकदा तुमची उंची सेंटीमीटरमध्ये मोजली की, त्याहून 100 वजा करावेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, जर एखाद्या महिलेची उंची 160 सेमी असेल तर त्यातून 100 वजा करावेत. म्हणजे उर्वरित 60 किलो वजन हे त्या महिलेसाठी योग्य सांगितले जाते. याशिवाय तज्ञ जर तुम्हाला घरात कोणाला कुटूंबात मधुमेह, हृदय किंवा कॅन्सरसारखे घातक आजार असतील तर त्यांनी 5 ते 6 किलो जास्त वजन कमी करावे असे म्हणतात.
पुरुष आणि महिलांचे अचूक वजन
19 ते 29 वर्षे वयोगट
पुरुष – 83.4 किलो वजन
महिला – 73.4 किलो
30- 39 वर्षे वयोगट
पुरुष – 90.3 किलो
महिला – 76.7 किलो
40 – 49 वर्षे वयोगट
पुरुष – 90.9 किलो
महिला – 76.2 किलो
50 ते 60 वर्षे वयोगट
पुरुष – 91.3 किलो
महिला – 77. किलो
हेही पाहा –
Comments are closed.