Beauty Tips : नेल एक्सटेंशन करताय ?

महिला आपले सौंदर्य वाढवण्यासाठी विविध उपाय करत असतात. आपल्या चेहऱ्यासह हात आणि पाय यांच्या स्वच्छतेकडे देखील अधिक लक्ष देतात. हल्ली नखे वाढवणे हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. याने आपले नखांचे सौंदर्य द्विगुणित होते. अनेक महिला त्यांच्या नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेल एक्सटेंशन करतात. या नेल एक्सटेंशनने आपली नखे अजून सुंदर आणि आकर्षक दिसतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? नेल एक्सटेन्शन केवळ नखांचे सौंदर्य वाढवत नाही तर तुमच्या नखांनाही हानी पोहोचवू शकते. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात नेल एक्सटेंशन केल्याने काय होते.

नैसर्गिक नखे डॅमेज हाेतात

नेल एक्सटेन्शन करण्यापूर्वी, नैसर्गिक नखे घासले जातात. ज्यामुळे त्यांची नैसर्गिक चमक कमी होते. नैसर्गिक नखे तुटू लागतात आणि त्यांच्या वाढीवर देखील परिणाम होतो. जेव्हा नेल एक्सटेन्शन काढले जातात तेव्हा हात खूप वाईट दिसू लागतात. नखे वाढवण्यादरम्यान अनेक रसायने वापरली जातात, ज्यामुळे नखांचा रंग खराब होऊ शकतो. यामुळे नखांवर रेषा, पांढरे किंवा काळे डाग, नखांमध्ये खड्डे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

स्किन इन्फेक्शन होते

नेल एक्सटेन्शन केल्याने दैनंदिन कामावर परिणाम होतो. बऱ्याचदा नेल एक्सटेन्शन करणारे लोक व्यावसायिक नसतात. अस्वच्छ साधनांमुळे बॅक्टेरिया त्वचेच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. याशिवाय, नखे चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळेही त्वचेचा संसर्ग पसरू शकतो.

क्यूटिकल्स ड्राय होऊ लागतात

नेल एक्सटेंशन केल्याने नखाच्या आजूबाजूच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी एक्स्ट्रा केअरची गरज असते. यामुळे क्यूटिकल्स ड्राय होऊ शकतात. त्यामुळे रॅशेज , खाज फोड तयार होऊ शकतात.ज्यामुळे खूप त्रास होऊ शकतो.

मोठ्या आजारांची भीती

नेल एक्सटेंशन करताना नखांवर लावलेले रसायने यूव्ही लाईट्सद्वारे वाळवले जातात. यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते आणि हातांची त्वचा जुनी दिसू शकते.याशिवाय, जर तुम्ही ही प्रक्रिया वारंवार करत राहिलात तर त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो.

हेही वाचा : Oily Skin Care : ऑयली स्किनसाठी वापरा चंदन पावडर


द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर

Comments are closed.