Exercise : सकाळी की संध्याकाळी? व्यायाम करण्याचे मिळतील फायदे
शरीर निरोगी ठेवायचे असल्यास दररोज न चुकता व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायामामुळे शरीर तंदुरूस्त आणि हेल्दी राहते. याउलट तुम्ही दररोज व्यायाम न केल्यास शरीर कमकुवत होते. परिणामी, शरीराला अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे तज्ञही दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देते. कोणी सकाळी तर कोणी संध्याकाळी व्यायाम करते. ज्याला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे व्यायामाची वेळ निवडून केला जातो. पण, शरीराला जास्तीत जास्त फायदे होण्यासाठी सकाळी की संध्याकाळी व्यायाम करणे फायद्याचे आहे जाणून घेऊयात या लेखातून
सकाळी व्यायाम करण्याचे फायदे –
- सकाळी व्यायाम केल्याने मेटॅबॉलिजम क्रिया वाढते, ज्यामुळे दिवसभर कॅलरीज बर्न होणे सोपे होते.
- एका रिसर्चनुसार, रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने शरीरात साठलेले फॅट्सचे ऑक्सिडेशन योग्यरित्या होते, ज्यामुळे फॅट्स कमी होतात.
- सकाळी व्यायाम केल्याने इन्सुलिनचे संतुलन राखले जाते.
- मानसिक आरोग्यासाठी सकाळी व्यायाम करणे फायद्याचे ठरते.
- सकाळी व्यायाम केल्याने तुम्हाला वेळ मिळतो. व्यायामापायी तुम्ही कोणत्या कामासाठी अडकून राहत नाही.
संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे –
- दुपारनंतर शरीराच्या स्नायुंमध्ये ताकद आणि शक्ती वाढते. त्यामुळे संध्याकाळी अधिक ताकदीने तुम्ही व्यायाम करू शकता.
- संध्याकाळी व्यायाम केल्याने हॅपी हार्मान्स बाहेर पडतात, यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि रात्री शांत झोप लागते.
- संध्याकाळी व्यायाम केल्याने स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात, ज्यामुळे व्यायाम करताना कोणतीही दुखापत होत नाही.
व्यायामासाठी योग्य वेळ कोणती?
प्रत्येक व्यक्तीचे जैविक चक्र वेगळे असते. एका व्यक्तीला आवडणारी गोष्ट दुसऱ्याची नावडती नक्कीच असू शकते. यासारखे एका व्यक्तीचे शरीर काही गोष्ट सहज पचवते तर दुसऱ्या व्यक्तीचे शरीर तीच गोष्ट स्वीकारत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरानुसार आणि सोयीनुसार व्यायामाची वेळ ठरवायला हवी. सकाळी हाडे, मसल्स मोकळे नसतात. त्यामुळे जास्त हेवी एक्सरसाइज केल्याने काहींमध्ये मसल्स फाटण्याची शक्यता असते. सकाळी व्यायाम केल्यावर काहींना फ्रेश वाटते तर काही दिवसभर थकलेले दिसतात. एकंदरच, जर तुमचे शरीर व्यायामाची एखादी वेळ स्वीकारत नसेल तर ती तुम्ही बदलायला हवी. सकाळी शरीर साथ देत नसेल तर संध्याकाळी व्यायाम करण्याला प्राधान्य द्यावे.
हेही पाहा –
Comments are closed.