Dark Circle : डार्क सर्कल दूर करणारी होममेड आय क्रीम
आपली त्वचा सुंदर, नितळ आणि स्वच्छ असावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. पण, बऱ्याचदा कोणतेही स्किन प्रॉब्लेम नसले तरी डार्क सर्कलची समस्या प्रकर्षाने जाणवते. यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, वाढता स्क्रीन टाइम, अपूर्ण झोप, डोळ्यांची सूज, ज्यामुळे डार्क सर्कल येतात. यावर उपाय म्हणून मेकअप करताना कन्सीलर लावले जाते किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या आय क्रीम विकत आणून लावल्या जातात. ज्यामुळे अतिरिक्त खर्च तुम्हाला करावा लागतो. अशावेळी तुम्ही होममेड आय क्रीम वापरायला हवी. होममेड आय क्रीममुळे पैसे तर खर्च होणार नाहीत याशिवाय कोणत्याही प्रकारची ऍलर्जी तुम्हाला होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात होममेड आय क्रीमच्या सोप्या रेसिपी
नारळाचे दूध आणि कॉफी –
नारळाच्या दूधात हेल्दी फॅट्स असतात, जे त्वचेला उजळवतात आणि हायड्रेट ठेवतात. कॉफीमुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे डार्क सर्कल कमी होतात.
साहित्य –
- नारळाचे दूध – 1 चमचा
- कॉफी ऑइल – 1 चमचा
- मेण – अर्धा चमचा
कृती –
- मेण वितळवून घ्यावे. यात नारळाचे दूध, कॉफी ऑइल मिक्स करावे.
- तयार मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
- तुमची होममेड आय क्रीम तयार झाली आहे.
शिया बटर आणि कॉफी –
शिया बटरमध्ये व्हिटॅमिन ए, ई मुबलक प्रमाणात आढळते, जे ड्राय स्किनसाठी बेस्ट मानले जाते. रोजहिप ऑइलमध्ये फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आढळते, जे कोलेजन उत्पादनास चालना देतात. ज्यामुळे डार्क सर्कलची समस्या कमी होते.
साहित्य –
- शिया बटर – 1 चमचा
- कॉफी ऑइल – 1 चमचा
- रोजहिप ऑइल – 1 चमचा
कृती –
- शिया बटर वितळवून घ्यावे. यात रोजहिप, कॉफी ऑइल मिक्स करावे.
- तयार मिश्रण थंड होण्यास ठेवावे.
- तयार आय क्रीम तुम्ही डार्क सर्कलवर लावू शकता.
हेही पाहा –
Comments are closed.