खरात पार्ट 2! टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडीओ, 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड; नोकरीच्या आमि
नाशिक: नाशिकमधील (Nashik Crime News) सातपूर येथे फिर्यादीच आरोपी झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) प्रकरण राज्यात चर्चेत असतानाच आता या प्रकरणामुळे देखील खळबळ उडाली आहे. बारा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सातपूर पोलिसात फिर्याद देणारा रवींद्र एरंडे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. एनजीओ संचालका तथाकथित पत्रकाराकडून 100 हुन महिलांचे लैंगिक शोषण (Nashik Crime News) झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आपल्याकडे 4 जण खंडणी मागत असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वीच एरंडे याने दिली होती. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या चार जणांना याआधीच पोलिसांनी अटक केली होती.(Nashik Crime News)
Nashik Crime News: टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्याने हे प्रकरण उघडकीस आले
संशयित आरोपी रवींद्र एरंडे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. सातपूरमधील या घटनेत फिर्यादीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे, तर 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप देखील या आरोपी रवींद्र एरंडे वरती आहे. नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण केल्याचा संशय व्यक्त होत आहे.(Nashik Crime News)
Nashik Crime News: अश्लील व्हिडिओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात देखील व्हिडीओ विक्रीचा संशय
त्याचबरोबर अश्लील व्हिडिओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात देखील व्हिडीओ विक्रीचा संशय देखील त्याच्यावरती आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का? याबाबत देखील तपास सुरू आहे. पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार , घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?
अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी पर्दाफाश करत चार संशयितांना अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे (६३), रा. अशोकनगर, सातपूर यानेच विविध महिलांसोबत आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडीओ चित्रण केले, अशी तक्रार आल्याने पोलिसांनी फिर्यादी एरंडेलाच बेड्या ठोकल्या. पीडितेच्या तक्रारीवरुन लैंगिक शोषण, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने अश्लील व्हिडीओकांडाला वेगळे वळण मिळाले आहे. माझ्याकडून १२ लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद एरंडेनेच दिली होती. मात्र, तोच आरोपीच्या पिंजऱ्यात गेला आहे. एरंडेने त्याने पीडित महिलांचे काढलेले व्हिडीओ देखील आहेत. भोंदू अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच अशाच स्वरूपाचे प्रकरण पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित बातमी – Nashik Crime News: अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये 12 लाखांच्या खंडणीचा नवा प्रकार; चार जणांना सिनेस्टाईल बेड्या, नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.