मूळ वेतन 25 हजारांवरुन 71 हजारांवर पोहोचणार, आठव्या  वेतन आयोगात पगार किती वाढणार? जाणून घ्या स


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाची रचना, संदर्भ अटी आणि कालावधी याला मंजुरी देण्यात आली आहे.  सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांना आठव्या वेतन आयोगाचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. आता आयोगाच्या स्थापनेपासून 18 महिन्याच्या कालावधीत अहवाल केंद्राकडे सादर केला जाईल.  आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून केली जाईल. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापने संदर्भातील आणि टर्म्स ऑफ रेफरन्स संदर्भातील केंद्रानं पावलं टाकल्यानंतर पगार किती वाढणार याची अनेकांना उत्सुकता आहे.

8th Pay Commission Payment : आठव्या वेतन आयोगानुसार पगार किती वाढणार?

टर्म ऑफ रेफरन्स म्हणजेच संदर्भ अटींचा विचार करुन वेतन आयोगाला शिफारशी द्याव्या लागतात. आठव्या वेतन आयोगाला केंद्राकडे शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. एखाद्या बाबीवर आयोगाचा अहवाल अंतिम झाल्यानंतर केंद्राला माहिती आवश्यक असल्यास अंतरिम अहवाल देखील द्यावा लागेल. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगार किती वाढणार याची उत्सुकता लागली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करताना जो फॉर्म्युला लागू करण्यात आला होता, ज्याच्या आधारे पगार वाढला होता.  तोच आधार घेत आठव्या वेतन आयोगात पगारात वाढ होईल, असा  अंदाज वर्तवण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 7000 रुपयांवरुन 18000 रुपये करण्यात आलं होतं.

आठव्या वेतन आयोगात सातव्या वेतन आयोगाचा फॉर्म्युला लागू केल्यास कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरुन वाढून ते 51480 रुपये मिळेल. या फॉर्म्युल्यासोबत फिटमेंट फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरेल. याशिवाय डीए मर्जर देखील होऊ शकतं. यावर आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार हे अवलंबून आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार हे फिटमेंट फॅक्टर आणि महागाई  भत्ता यावर अवलंबून असेल. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता जो आठव्या वेतन आयोगात 2.86 होऊ शकतो. डीएचा विचार केला तर प्रत्येक वेतन आयोग जेव्हा लागू होतो तेव्हा महागाई भत्ता 0 होतो. कारण मूळ वेतन महागाई लक्षात घेऊन निश्चित केलं जातं. सध्या सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 58 टक्के आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार पगाराचं समीकरण

मूळ वेतन : 25000 रुपये
महागाई भत्ता 58 टक्के : 14500 रुपये
घरभाडे भत्ता (मेट्रो : 27 टक्के) : 6750 रुपये
एकूण वेतन : 46250 रुपये

आठवा वेतन आयोग

मूळ वेतन : 25000 * 2.86 (फिटमेंट फॅक्टर) = 71500 रुपये
महागाई भत्ता : 0
घरभाडे भत्ता (मेट्रो : 27 टक्के) : 19305 रुपये
एकूण वेतन : 90805 रुपये

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

महागाई आणि लिविंग कॉस्टच्या आधारावर एक क्रमांक निश्चित केला जातो, ज्याला फिटमेंट फॅक्टर म्हटलं जातं. ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि पेन्शनधारकांची मूळ पेन्शन निश्चित होते. फिटमेंट फॅक्टर आणि सध्याच्या मूळ वेतनाचा गुणाकार करुन आठव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाची रक्कम काढता येऊ शकते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.