9 एअर इंडिया फ्लाइट्स ग्राउंड
अहमदाबाद दुर्घटनेनंतर 84 विमानोड्डाणे रद्द
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअर इंडियाने शुक्रवारी दुपारपर्यंत 9 उ•ाणे रद्द केली होती. यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय आणि 5 देशांतर्गत विमानांचा समावेश आहे. विमानतळावरील देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. देशांतर्गत उड्डाणांमध्ये पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान एआय874, अहमदाबादहून दिल्लीला जाणारे विमान एआय456, हैदराबादहून मुंबईला जाणारे विमान एआय2872 आणि चेन्नईहून मुंबईला जाणारे विमान एआय571 रद्द करण्यात आले आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये दुबईहून चेन्नईला जाणारे विमान एआय906, दिल्लीहून मेलबर्नला जाणारे विमान एआय308, मेलबर्नहून दिल्लीला जाणारे विमान एआय309 आणि दुबईहून हैदराबादला जाणारे विमान एआय2204 यांचा समावेश आहे. विमान वाहतुकीशी संबंधित आणखी एका घटनेत दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. एकंदर अहमदाबाद विमान अपघातानंतर गेल्या 9 दिवसांत विविध कारणांमुळे 84 उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत.
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातात 270 लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रत्येक विमानतळावर विमानांची ऑपरेशनल तपासणी कडक करण्यात आली आहे. दिल्लीहून व्हिएतनामला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय388 मध्यंतरी दिल्लीला परत बोलावण्यात आले होते. या विमानात 130 प्रवासी होते.
Comments are closed.