बोत्सवानामधील 9 चित्ते 'कुनो'मध्ये दाखल
पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत उद्यानात सोडले
वृत्तसंस्था/ श्योपूर
मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्स्वानातील नऊ चित्ते सोडण्यात आले. याप्रसंगी पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, वन अधिकारी आणि इतर मान्यवर राष्ट्रीय उद्यानात उपस्थित होते. बोत्स्वानातून आणण्यात आलेल्या नव्या चित्त्यांना भारतातील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी आणि आरोग्य देखरेखीसाठी महिनाभर क्वारंटाइनमध्ये ठेवले जाईल.
2022 मध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेल्या चित्ता प्रकल्पामुळे चित्त्यांची संख्या वाढत आहे. चित्त्यांची संख्या आणखी वाढविण्यासाठी भारताच्या ट्रान्सलोकेशन प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी 9 चित्त्यांना आफ्रिकेतून कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. सदर चित्त्यांना विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आणि नंतर भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरद्वारे ग्वाल्हेरहून कुनो येथे नेण्यात आले. या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान वैज्ञानिक आणि पशुवैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.
Comments are closed.