Oldest Swimming Pools In India : भारतातील सर्वांत जुने स्विमिंग पूल कोणते?

भारतात अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. यामध्ये अनेक प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि तलावांचा समावेश आहे. प्राचीन काळात बांधल्या जाणाऱ्या वास्तूंमध्ये लहान लहान जलतरण तलाव म्हणजेच स्विमिंग पूल बांधले जायचे. ज्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचे बांधकाम व्हायचे. पुढे ब्रिटिश काळात या तलावांचे आधुनिकीकरण झाले. तेव्हापासून देशात स्विमिंग क्लबचा ट्रेंड सुरू झाला. आज आपण अशाच काही जुन्या स्विमिंग पूल्सची माहिती घेणार आहोत. जे 1800 च्या उत्तरार्धात आणि 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला बांधले गेले होते. (Oldest Swimming Pools In India)

1) ब्रीच कँडी स्विमिंग पूल, मुंबई

दक्षिण मुंबईतील या प्रसिद्ध तलावाचे बांधकाम 1876 मध्ये झाले होते. हा तलाव त्याच्या अद्वितीय डिझाइनसाठी आणि नैसर्गिक खाऱ्या पाण्यासाठी ओळखला जातो. हा तलाव वसाहतवादी काळात केवळ निवडक गटासाठी खुला होता. पण आज ब्रीच कँडी स्विमिंग बाथ ट्रस्टद्वारे मेंबरशिप दिली जाते.

२) कलकत्ता स्विमिंग क्लब, कोलकाता

स्ट्रँड रोडवरील हा तलाव 1887 मध्ये वसाहतवादी अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आला होता. त्या काळात इथे महिलांना प्रवेश प्रतिबंधित होता. पण हळूहळू इथे अनेक बदल झाले आणि मिश्र प्रवेशास मान्यता मिळाली. अनेक बदलांनंतरही हा क्लब कोलकाताच्या सामाजिक जीवनाचा एक मान्यताप्राप्त भाग म्हणून ओळखला जातो.

3) कॉलेज स्क्वेअर स्विमिंग क्लब, कोलकाता

स्थानिक क्रीडाप्रेमींनी 1927 मध्ये कलकत्ता विद्यापीठाजवळ हा स्विमिंग पूल बांधला. सुरुवातीला फक्त व्यावसायिक कुटुंबे, राजघराणे आणि कायदेशीर व्यावसायिक इथले सदस्य होते. इथे स्विमिंगचा अभ्यास केलेले जलतरणपटू द्वारकादास मुलजी यांनी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांची कामगिरी 1928 मध्ये देशाच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा भाग ठरली.

4) वाईएमसीए कॉलेज पूल, चेन्नई

वायएमसीए कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे 1942 मध्ये हा स्विमिंग पूल बांधला गेला. क्रीडा शिक्षणातील महत्त्वाची व्यक्ती हॅरी क्रो बक यांच्या काळात हा पूल तयार झाला होता. देशात औपचारिक क्रीडा प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.

5) मरीना स्विमिंग पूल, चेन्नई

प्रेसिडेन्सी कॉलेजसमोर 1947 मध्ये मरीना स्विमिंग पूल बांधण्यात आला. सार्वजनिक सुविधेसाठी बांधण्यात आलेला हा पूल 100 मीटर लांबीचा होता. चेन्नईच्या नागरी अधिकाऱ्यांद्वारे येथील व्यवस्थापन पाहिले जाते. गेल्या काही वर्षांत या पुलाचे नूतनीकरण झाले असून सर्वात उल्लेखनीय सार्वजनिक पुलांमध्ये त्याचा सहभाग आहे.

हेही वाचा –

अंक: हे या काळातील भाग्यवान लोक, भाग्यवान, लोकांचे लोक आहेत.

Comments are closed.