Bank Rules: बँकेचा नियम; खातेधारक आणि नॉमिनीचा मृत्यू; मग कोणाला मिळणार खात्यातील पैसे?
आजकाल देशातील बहुतेक लोक बँकिंग सेवांशी जोडलेले आहेत. बँक खाते नसणारा क्वचितच कोणी तरी असेल. जर तुमचे बँक खाते असेल तर त्याच्याशी संबंधित काही नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. जसे की, खातेधारकाला एक नाव नॉमिनी म्हणून देणे बंधनकारक असते. मात्र नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीचा खातेधारकासह मृत्यू झाल्यास खात्यातील पैसे कोणाला मिळतात? हे माहित आहे का? त्याबाद्दलच आपण जाणून घेऊया…
नॉमिनी म्हणजे काय?
सर्वात आधी तर नॉमिनी म्हणजे कोण हे माहित असणे गरजेचे आहे. तर जेव्हा एखादा व्यक्ती बँकेत खाते उघडतो तेव्हा त्याला नॉमिनी म्हणून एका व्यक्तीचे नाव द्यावे लागते. नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीचा खातेधारकाच्या मृत्यूनंतर खात्यातील पैशांवर अधिकार असतो.
नॉमिनीच्या मृत्यूनंतर पैसे कोणाला मिळतात?
एखाद्या परिस्थितीत जर नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीचा खातेधारकासह मृत्यू झाल्यास खात्यातील पैसे हे कायदेशीर वारस असणाऱ्या व्यक्तीला मिळतात. हा व्यक्ती खातेधारकाच्या कुटुंबातील सदस्य असतो. जसे की, पती, पत्नी, पालक, मुले किंवा भावंड हे कायदेशीर वारस असू शकतात.
हे लक्षात घ्या..
- खातेदार आणि नॉमिनीचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना बँकेला याबाबत माहिती द्यावी लागते.
- याशिवाय मृत्यू प्रमाणपत्र बँकेला द्यावे लागते. खातेधारकाशी असलेले नाते सिद्ध करूनच कुटुंबातील सदस्य बँकेकडून खात्यातील पैसे घेऊ शकतात.
- शिवाय अनेक प्रकरणांमध्ये, बँक कुटुंबातील सदस्याकडून अस्वीकरण पत्र किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र देखील मागू शकते.
- तसेच खात्यात जास्त पैसे असल्यास, न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागते.
- बँक भारतीय उत्तराधिकार कायद्याअंतर्गत कुटुंबातील सदस्यांमध्ये हे पैसे वितरित करते.
Comments are closed.