Stress Relief Tips: मूड ऑफ झाल्यावर या सोप्या टिप्स करतील मदत

आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस हा कॉमन फॅक्टर झाला आहे. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या अशा अनेक समस्या आपल्याला दैनंदिन जीवनात भेडसावत असतात. त्यामुळे अनेकदा आपला मूड ऑफ होतो. म्हणजेच मन अस्वस्थ होते, एकटे राहण्याची इच्छा होते, कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी काय करावं हे कळत नाही. आज आपण काही सोप्या टिप्स जाणून घेऊया ज्यामुळे तुमचा मूड त्वरित लाईट होईल..

फोनचा वापर

आजच्या काळात, स्ट्रेसचे सर्वात मोठे कारण म्हणजे फोन. अशा परिस्थितीत, तुम्ही डिजिटल डिटॉक्स करणे गरजेचे आहे. म्हणजेच दररोज किमान तीन तास फोन एअरप्लेन मोडवर ठेवा. या काळात तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट करा किंवा ती शिकण्यात वेळ घालवा.

एकाच ठिकाणी बसणे

आजकाल अनेक जण घरून काम करतात. मात्र एकाच ठिकाणी बसल्यामुळे तुम्हाला कंटाळा आल्यासारखे वाटू शकते. त्यासाठी कॅफे, घराची बाल्कनी किंवा बागेत बसून तुम्ही काम करू शकता. एकाच वातावरणात सतत काम करत राहिल्याने देखील ताण वाढतो.

बॉक्स श्वास

तणाव कमी करण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो. यामध्ये, तुम्हाला दीर्घ श्वास घेऊन हळूहळू सोडावा लागतो. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर चांगला परिणाम होतो. साहजिकच तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते.

भावना

तणाव टाळण्यासाठी, स्वतःच्या भावना ओळखणे महत्वाचे आहे. असे बऱ्याचदा होते की आपल्याला राग येतो, पण त्यामागचे नेमके कारणच आपल्याला माहित नसते. त्यामुळे भावना समजणे गरजेचे आहे. त्या लक्षात येताच तुम्ही उपाय करू शकता.

चहा, कॉफी

चहा किंवा कॉफी हे सतत घेणे आरोग्यासाठी घातक असते. मात्र तुमचा मूड लाईट करण्यासाठी कधीकधी तुम्ही एखादा कप चहा किंवा कॉफी घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थही खाऊ शकता.

Comments are closed.