अंक: या तारखेला जन्मलेले हे लोक भाग्यवान आहेत आणि जिवंत राजशाही आहेत.
काहीजण जन्मताच भाग्यवान असतात, तर काहींच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात हळूहळू सुख-समृद्धी येण्यास सुरुवात होते. तसेच अंकशास्त्रानुसार, विशिष्ट तारखेला जन्मलेल्या लोकांना भाग्यवान समजले जाते. अंकशास्त्रात अशा तीन तारखा सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचा या दिवशी जन्म होतो, ते राजेशाही थाटात आयुष्य जगतात असे सांगितले जाते. तसेच या व्यक्ती नेतृत्वगुणाच्या असतात. या व्यक्ती राजेशाही जीवनशैली, आत्मविश्वास आणि स्वाभिमानासाठी ओळखल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत, या तीन तारखा कोणत्या आहेत.
1, 10 आणि 19 तारीख –
अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे 1, 10 आणि 19 तारखेला जन्मलेले लोक, ज्यांचा मूळ क्रमांक 1 आहे, अशा व्यक्ती राजेशाही थाटात जीवन जगतात. यांचा स्वामी सूर्य ग्रह असतो. या व्यक्ती स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नाही.
राजेशाही जीवन –
या व्यक्तींना राजेशाही जीवन जगायला आवडते. कपडे, राहणीमान या सर्व गोष्टींमध्ये हे लोक राजेशाही थाट शोधत असतात. यांना आलिशान कार, उत्तम घरे आणि स्टायलिश राहायला आवडते.
स्वत:च्या अटींवर जगतात या व्यक्ती –
1 क्रमांकाच्या व्यक्ती स्वत:च्या अटींवर जगतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. या व्यक्ती कोणताही संकोच न करता पुढे चालत राहतात. मग ते नोकरी असो वा व्यवसाय असो. जिथे जातात तिथे स्वत:ची छाप सोडतात.
प्रतिक्रिया त्वरीत देतात –
या तारखेल्या जन्मलेल्या व्यक्ती त्यांच्या सन्मानाशी तडजोड करत नाही. जर त्यांच्या सन्मानाला कोणी दुखावले तर लगेच उत्तर देतात.
हस्तक्षेप आवडत नाही –
1 क्रमांकाच्या व्यक्तींना स्वातंत्र्य आवडते. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन सहन होत नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास आवडतात.
पैसे खर्च करताना विचार करत नाही –
या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती कुटूंबावर आणि मित्रांवर खर्च करण्यापूर्वी विचार करत नाही. सुखसोयी यांना महत्त्वाच्या असतात.
हेही पाहा –
Comments are closed.