Numerology: या तारखांना जन्मलेल्या मुली असतात भयंकर रागीष्ट
ज्योतिषशास्त्राच्या एका महत्त्वाच्या शाखेत ‘अंकशास्त्र’ म्हणजेच न्यूमरॉलॉजी (Numerology) येते. या शास्त्रानुसार, एखाद्याचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून त्याचा मूलांक ठरतो. आणि त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी, यशाचे मार्ग आणि वैयक्तिक आयुष्य या साऱ्यांवर परिणाम होत असतो. (personality traits girls born on 9 18 27 dates numerology number 9)
आज आपण बोलतोय मूलांक 9 असलेल्या मुलींच्या स्वभावाविषयी. म्हणजेच ज्या मुलींचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 9 धरला जातो. या मूलांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साहस, धाडस, थोडासा राग आणि आत्मविश्वासाची छाप दिसते.
मूलांक 9 असलेल्या मुली स्वतःच्या मतांवर ठाम असतात. त्यांचा स्वभाव आकर्षक, पण थोडासा रागीट आणि अहंकारी असतो. काही वेळा या स्वभावामुळे त्या इतरांशी मतभेद ओढवून घेतात, तर काही वेळा लोक त्यांचं स्पष्ट बोलणंही सहज पचवू शकत नाहीत. मात्र, या रागाखाली एक भावनिक आणि मजबूत स्वभाव लपलेला असतो.
या मुली स्वावलंबी असतात. कोणत्याही अडचणीत त्या स्वतःचा मार्ग शोधतात. जीवनात संघर्ष सुरूवातीस भासत असला, तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्या यशाचा शिखर गाठतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्या शक्य करून दाखवतात. त्यामुळे त्यांना ‘करून दाखवणाऱ्या’ व्यक्ती म्हणून ओळखलं जातं.
प्रेमसंबंधात या मुलींना अनेकदा अडथळे येतात. त्यांचा थेट बोलण्याचा स्वभाव, मतांवर ठाम राहणे आणि कमी संयम यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. काही वेळा त्यांचा अहंकारही नातेसंबंधांमध्ये दुरावा आणतो. पण करिअरच्या बाबतीत मात्र त्या खूप भाग्यवान असतात. मेहनती आणि यशस्वी होण्याची जिद्द यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट राहते. त्या सतत उंची गाठण्याच्या प्रयत्नात असतात.
Comments are closed.