Shreyasi Joshi : रोलर स्केटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी श्रेयसी जोशी
स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करणे हे काही सर्वांनाच जमतं असं नाही. पण, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी केवळ पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं नाही तर देशाचं नावंही मोठं केलं आहे. त्यापैंकी एक उदाहरण म्हणजे पुण्याची लेक श्रेयसी जोशी. 21 वर्षीय श्रेयसीने स्केटिंग विश्वात तिरंगा मानानं फडकवला आहे. नुकताच तिने कोरियात झालेल्या आशिया रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकून इतिहास घडवला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.
मुळची कोथरुडची –
श्रेयसी जोशी मुळची कोथरुडची आहे. वयाच्या 3 वर्षांपासून ती स्केटिंग शिकत आहे. शाळेत शिकत असताना ग्राऊंडवर अनेकांना स्केटिंग शिकताना पाहून हे आपणही शिकाव असं तिला वाटायचे, तीने हीच प्रेरणा घेऊन स्केटिंग शिकण्यास सुरुवात केली असं ती सांगते. श्रेयसी सध्या एमआयटी कॉलेज येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. शिक्षण घेता – घेता स्केटिंगची प्रॅक्टिस करताना तारेवरची कसरत करावी लागते, असे श्रेयसी सांगते. पार्किंग स्लॉटमध्ये श्रेयसी सराव करते.
स्केटर्स बहिणी –
आजवर श्रेयसीनं 13 आंतरराष्ट्रीय आणि 19 राष्ट्रीय पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. या खेळात कोन्स 50 मीटर, 80 मीटर आणि 120 मीटर अंतरावर ठेवले जातात. स्केटर्सना त्या कोन्सच्या दरम्यान वेगवेगळ्या स्टेप्स आणि ट्रिक्स करत परफॉर्म करावं लागतं. या खेळासाठी स्ट्रेन्थ आणि फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची असते. केवळ श्रेयसीचं नाही तर तिची लहान बहिण स्वराली जोशी देखील स्केटिंग करत देशांचं नाव मोठं करत आहे. स्वरालीने देखील नऊपेक्षा जास्त राष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर दोघींची स्केटर्स सिस्टर्स अशी ओळख आहे.
श्रेयसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय की, आई बाबांनी मला लहानपणापासूनच स्केटिंग आणि अभ्यास या दोन्हींमध्ये समतोल ठेवायला शिकवलं आहे. त्यामुळेच हे शक्य झालं आहे.
एकदरंच, जिद्द, चिकाटी आणि सातत्य दाखवत मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेल्या आणि पार्किंग स्लॉटमध्ये सराव करणाऱ्या श्रेयसीने तिच्या कामगिरीच्यामाध्यमातून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हेही पाहा –
Comments are closed.