Kiara Advani : कियारा अडवाणीच्या सौंदर्याचे रहस्य आले समोर; हा फेस पॅक लावते अभिनेत्री
अनेकदा स्किनकेअरसाठी आपण महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र तरीही आपल्याला हवा तास रिझल्ट येत नाही. अशा वेळी काही घरगुती नैसर्गिक उपाय करून देखील स्किनकेअर केले जाऊ शकते. घरगुती उपायांमध्ये कोणत्याही प्रकारचे रसायने नसतात. विशेष म्हणजे काही सेलिब्रिटी सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करतात. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्या सौंदर्याचे रहस्य देखील असाच एक घरगुती फेस पॅक आहे. स्वतः कियारा अडवाणीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
कियारा अडवाणीचा फेस पॅक
कियारा अडवाणी तिच्या चेहऱ्यावर एक घरगुती फेस पॅक लावते. हा तिच्या आजीचा उपाय असल्याचे तिने सांगितले आहे. बेसन, दूध, क्रीम आणि थोडे मध आणि लिंबाचा रस हे घटक वापरून हा फेस पॅक तयार होत असल्याचे तिने म्हंटले आहे. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाते आणि चेहरा चमकदार दिसतो.
हे फेस पॅकही ठरतात प्रभावी
- ओटमील आणि दूध मिसळून तुम्ही फेस पॅक देखील तयार करू शकता. ओटमील बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक त्वचेला उजळ करतो.
- तुम्ही कोरफडीचा आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता. हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट करतो. 20-25 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा धुवा.
- चेहऱ्यावर हळद आणि दही लावल्याने त्वचेला चमक येते. 2 चमचे दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवल्यानंतर धुवा.
- तुम्ही चेहऱ्यावर क्रीम देखील लावू शकता. क्रीम हातावर घेऊन चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचा मऊ राहते.
Comments are closed.