PHOTO : नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांचं समुद्राला साकडं, म्हणाले कृपा असावी
मुंबई : नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी दर्याला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. तसेच वर्षभर भरपूर मासे मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात येते. याशिवाय नारळी पौर्णिमा सणानिमित्त पारंपारिक गोडधोड पदार्थ करून मनसोक्त नाच गाण्याने जल्लोष केला जातो.
नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवाचा महत्त्वाचा सण आहे.
कोळी बांधवांच्या प्रत्येक घरात नारळाचे वडे, नारळी भात आणि नारळापासून बनणारे विविध गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात.
या दिवशी सूर्यास्तावेळी पुरुष मंडळी कमरेला रुमाल बांधून, तर स्रिया पारंपारिक वेशभूषेत नटलेले पाहायला मिळतात.
महिला आणि पुरुष कोळी गीतांवर नाचत गाजत समुद्राकडे सोन्याचा नारळ घेऊन जातात आणि तिथे पूजा करतात.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
कोळी बांधव खवळलेल्या समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून सागराला शांत राहण्याची विनंती करतात.
मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, धारावी, माहूल, कुलाबा या सर्व कोळीवाड्यांत आज नारळी पौर्णिमेचा उत्सव पारंपारिक रीतीरिवाजांसह साजरा करण्यात आला.
हा सण कोळी समाजाच्या श्रद्धेचा, सांस्कृतिक ओळखीचा आणि समुद्राशी असलेल्या घट्ट नात्याचा जिवंत प्रतीक आहे.
Comments are closed.