Raksha Bandhan Wishes : दूर राहणाऱ्या भावा-बहिणीला पाठवा या प्रेमळ शुभेच्छा
भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2025). दोघांमधील अतुट नात्यांच्या हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला आज साजरा होत आहे. आजच्या या शुभदिनी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची, समृद्धीची कामना करते. तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि सोबत तिला भेटवस्तूही देतो. पण, तुमचा भाऊ किंवा बहिण तुमच्यापासून लांब असेल आणि भेट होणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता (Raksha Bandhan Wishes Messages Status In Marathi) आणि या सणाचा गोडवा आणखी वाढवू शकता.
एक धागा, एक विश्वास
भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आज दिवस खास
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा !
आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही कारण,
माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ,
जेवढं बहिण-भावाचे नाते असते गोड
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
लहान असो वा मोठी,
बहिण हवी एक तरी पाठिशी
प्रेमळ असो वा थोडी चिडकी.,
बहिण असतेच नेहमी हवीशी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
अंधारात असते साथ त्याची
आनंदात त्याच्याच कल्ला असतो,
अनुभवी आणि निरपेक्ष
माझ्या भावाचा सल्ला असतो
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
राखी म्हणजे प्रेम
राखी म्हणजे ओलावा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
फक्त भावा-बहिणीचे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
हेही पाहा –
Comments are closed.