तोंडाची दुर्गंधी असू शकते या आजारांचे लक्षण

तोंडाची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न केल्यास आणि पोकळी जमा झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. काहीवेळा शरीराता होणाऱ्या बदलांमुळे अनेक केमिकल्स बाहेर पडतात, ज्यामुळे श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. तर कधी कधी हे एखाद्या धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते. यात कॅन्सरपासून ते किडनी खराब होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात.

फुफ्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer)

एका रिसर्चनुसार, फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ब्रीद टेस्ट करता येते. यात इलेक्ट्रिक नोजची मदत घेण्यात येते. या डिवासमुळे धुम्रपान करणारे आणि न करणारे या दोन्ही लोकांमध्ये कॅन्सरचे निदान करता येते.

किडनी निकामी होणे (Kidney)

जर तोंडातून माशांचा वास येत असेल तर किडनी खराब होण्याचे हे लक्षण असू शकते. खरं तर, जेव्हा किडनी निकामी किंवा खराब होते तेव्हा शरीरातून टॉक्सिन बाहेर पडण्याऐवजी रक्तात वाढू लागते. हे किडनी निकामी होण्याच्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये दिसते. तसेच यासोबत थकवा आणि युरीनमध्ये काही बदल दिसण्यास सुरूवात होते.

हृदय (हृदय)

जेव्हा हृदयाला पंम्पिंग करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते तेव्हा शरीरात एसीटोन आणि पेटेंन नावाची केमिकल्स बाहेर पडतात. हे केमिकल्स श्वासाला अधिक दुर्गंधीयुक्त बनवतात. त्यामुळे रिसर्चनुसार असे सांगण्यात आले आहे की, हे सुद्धा हार्ट फेल्युअर होण्याचे लक्षण आहे.

मधुमेह

डायबिटीज असल्यास व्यक्तीला तोंडाशी संबंधित आजार होण्याची शक्यता दाट असते. जर तोंडात एसीटोन किंवा फळांचा वास असेल तर ते डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस असू शकते. ही देखील एक जीवघेणी स्थिती आहे.

पोटाशी संबंधित समस्या (Stomach)

तोडांच्या दुर्गंधीमागे पोटाचे बिघडलेले आरोग्य असू शकता. हे बहुतेकदा अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स रोगामध्ये होते. जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा ते गॅस आणि न पचलेले अन्न देखील आणते, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=XHMOZT4ZXDI

Comments are closed.