Angarki Chaturthi 2025:अंगारकी चतुर्थी मुहूर्त, पुजा विधी आणि माहात्म
येत्या 12 ऑगस्टला ‘अंगारकी चतुर्थी’ आहे. वैदिक शास्त्रानुसार, ‘अंगारकी चतुर्थी’ ही अत्यंत खास मानली जाते. यंदाच्या श्रावण महिन्यातील चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ असलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. श्री गणेशाची उपासना करणाऱ्यांसाठी चतुर्थी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते. याशिवाय असे सांगितले जाते की, या दिवशी पूजा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. आज आपण जाणून घेऊयात 2025 मधील अंगारकी चतुर्थी मुहूर्त, माहात्म आणि पुजा विधी
अंगारकी चतुर्थी मुहूर्त –
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी मंगळवारी 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.40 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6.35 वाजता होईल. उदयतिथीनुसार, चतुर्थीचे व्रत 12 ऑगस्ट रोजी केले जाईल. चंद्रोदय रात्री 9:17 वाजता आहे
अंगारकी चतुर्थी पूजाविधी –
- श्री गणेशासाठी उपवास करावा.
- गणपती अथर्वशीर्षचे पठण करावे.
- तुम्ही बाप्पाच्या मंत्राचा 108 वेळा जाप करू शकता.
- दूर्वा, शेंदूर, मोदक बाप्पाला अर्पण करावे.
- चंद्र दर्शनानंतर उपवास सोडावा.
- गणपती मंदिरात लाडू किंवा मोदक तुम्ही दान करू शकता.
महटमा –
काही ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, अंगारकी चतुर्थी हा मोक्षाचा दिवस मानला जातो. याशिवाय असे देखील सांगितले जाते की, या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू पौराणिक कथांनुसार, श्री गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जातात. म्हणूनच श्री गणेशाची पूजा केल्याने भक्तगणांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यास आणि त्यांच्या जीवनातील समस्या कमी करण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते. गणेशाच्या या रूपाला ‘संकटमोचन गणेश’ असे म्हणतात.
हेही पाहा –
Comments are closed.