बैठ्या कामामुळे बदलतोय हाडांचा आकार

जर तुम्हीही दिवसातील सर्वाधिक वेळ बसून काम करण्यात घालवत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण सध्याच्या बदलत्या वर्क कल्चरमध्ये फिल्डवर काम करणाऱ्यांच्या तुलनेत ऑफिसमध्ये बसून किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हाडांची दुखणी वाढत असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने दिवसभर आठ- नऊ तास बैठे काम करणाऱ्यांना पाठदुखीबरोबरच मानदुखीचे विकार होत आहेत. हे कर्मचारी दिवसातील जास्तीत जास्त वेळ एकाच जागी एकाच पोझीशनमध्ये काम करत असल्याने हळूहळू त्यांच्या हाडांचा आकारच बदलू लागल्याचे तज्त्रांनी सांगितले आहे. या अवस्थेला ऑफिस चेयर सिंड्रोम असे नाव देण्यात आले असून वयस्क व्यक्तींपेक्षा तरुणांमध्ये हाडांचा हा नवा विकार वेगाने वाढत आहे.

बैठ्या कामात व्यक्ती कम्प्युटर समोर साधारण ७ ते ८ तास एकाच जागी बसून काम करते. अशावेळी शरीराचा भार मणके व कंबर, नितंब, पायांवर पडतो.त्यामुळे शरीराच्या नैसर्गिक रचनेवर त्याचा परिणाम होतो. परिणामी हळूहळू सांधे व स्नायू, नसा कमकुवत होतात आणि त्याचा आकार बदतो. त्यामुळे हाड ठिसूळ होतात. यामुळे बैठे काम करणाऱ्यांना हाडे व स्नायूंच्या समस्या त्रास देतात. शरीरात ब्लड सकर्युलेशन नीट होत नाही. यामुळे स्लिप डिस्क, सर्वायकल स्पॉन्डेलायसिस, वेरिकोज वेन्स, नसा सुजणे- फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात. यावर वेळीच उपाय न केल्यास भविष्यात ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. शरीराची हाचचाल नसल्याने पचनासंबंधी समस्या निर्माण होतात. टाईप २ डायबिटीज. ब्लड प्रेशरसारख्या व्याधी मागे लागतात.

बचावासाठी काय करावे ?

यासाठी जर सुरुवातीपासून योग्य खबरदारी घेतली तर ऑफिस चेयर सिंड्रोमचा धोका टाळणे शक्य आहे.

  • त्यासाठी दर १५ मिनिटांनी बसल्या जागेवरून उठावे
  • २.३ मिनिट चालावे, स्ट्रेचिंग करावे.
  • पाणी बाजूला घेऊन न बसता जागेवरून उठावे.
  • त्यामुळे शरीराची हालचाल होते.
  • काम करतेवेळी कम्प्युटर किंवा लॅप टॉप तुमच्या डोळे व शरीरापासून ठराविक उंचीवर ठेवावा.
  • साधारण खुर्ची न वापरता एर्गोनॉमिक खुर्चीचा वापर करावा
  • बसल्यावर पाय जमिनिला टेकतील असे बसावे.
  • दररोज ३० मिनिट चालावे.

 

 

हेही पाहा –

Comments are closed.