Krishna Janmashtami :15 की 16 ऑगस्ट, कधी आहे श्रीकृष्णजन्माष्टमी?

श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना.. नुकताच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला आहे. आता काही दिवसातच श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी होणार आहे. जन्माष्टमीचा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. असे सांगितले जाते की, श्रीकृष्णाच्या जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रात झाला होतो. यंदासुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरो होईल, पण, यंदा श्रीकृष्णजन्माष्टमी नेमकी 15 की 16 ऑगस्टला आहे याबाबत अनेकजणांमध्ये संभ्रम दिसून येत आहे, जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे.

मुहुर्ता –

श्री कृष्णजन्माष्टमीची तिथी 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी रात्री 09.43 वाजता संपेल.

पूजा मुहुर्ता –

जन्माष्टमीच्या पूजेचा मुहूर्त 16 ऑगस्टला रात्री 12 वाजून 4 मी. सुरू होऊन रात्री 12 वाजून 47 मी.नी संपेल.

पूजा करण्याची पद्धत –

विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने श्री कृष्णाची जन्माष्टमी साजरी केली जाते.

  • जन्माष्टमीची पूजा सूर्योदयापूर्वी सुरू होते.
  • यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करून घ्या.
  • स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • श्री कृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोला गंगाजलने अभिषेक करावा.
  • नवीन कपडे घालावेत. त्याला फुले, फळे आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा.
  • आरती करावी.
  • पाळणा म्हणावा.

जन्माष्टमीची कथा –

पौराणिक कथेनुसार, कंसाने आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासूदेव यांना कैदेत ठेवले होते. यांना कैदेत ठेवण्यामागे आकाशवाणी कारण होते. आकाशवाणीनुसार, देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल, असे सांगण्यात आले होते. या आकाशवाणीला घाबरून देवकीच्या एकूण सात मुलांना कंसाने मारले होते. त्यामुळे जेव्हा कृष्णाचा म्हणजे देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्म झाला, तेव्हा वासुदेवाने त्याला एका सुरक्षित ठिकाणी, गोकुळात, यशोदा आणि नंद राजाकडे घेऊन गेले. कृष्णाचे पालनपोषण यशोदेने केले आपणा सर्वांना माहीत आहे. यानंतर कृष्णाने मोठे झाल्यावर कंसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले.

 

 

हेही पाहा –

Comments are closed.