Back Pain : प्रेग्नन्सीमधील पाठदुखी

प्रेग्नन्सीमध्ये महिलेच्या शरीरात हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. काही महिलांचे वजन वाढते, काहींच्या गर्भाशयाचा आकार बदलतो. ज्यामुळे मणक्यावर दाब येतो आणि परिणामी पाठदुखी सुरू होते. या दिवसात सतत होणाऱ्या पाठदुखीमुळे झोप अपूर्ण होते, चालताना-फिरताना त्रास होतो. एकूणच महिलेच्या संपूर्ण दिनचर्येवर याचा परिणाम होण्यास सुरूवात होते. त्यामुळे तज्ज्ञमंडळी प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगतात.

प्रेग्नन्सीमध्ये पाठदुखीची अनेक कारणे आहेत. प्रेग्नन्सीमध्ये महिलेचे वजन वाढू लागते. वाढत्या वजनामुळे हाडांवर आणि पाठीच्या स्नायूंवर परिणाम होतो. वजनामुळे या दोन्हींवर प्रेशर येते. तर हार्मोनल बदलांमुळे, शरीर रिलॅक्सिन नावाचे हार्मोन सोडते, जे लिगामेंटसला सैल करते. ज्यामुळे डिलीव्हरीसाठी शरीर तयार होते. पण, यामुळे साध्यांमध्ये वेदना सुरू होतात. यासह बाळाच्या जन्मावेळी महिलेच्या संपूर्ण शरीराचा बॅलन्स बिगडतो आणि कमरेच्या खालच्या भागात वेदना सूरू होतात आणि पाठदुखी तीव्रपणे जाणवू लागते.

उपाय –

  • तज्ज्ञांच्या मते, या दिवसात होणाऱ्या पाठदुखीपासून आराम मिळण्यासाठी उठताना बसताना शरीराच्या विशिष्ट ठेवणीकडे लक्ष द्यावे.
  • खुर्चीवर बसताना पाठ सरळ असेल याची बाळगावी. बसताना पाठ पूर्णपणे खूर्चीला टेकलेली असेल याची खबरदारी घ्यावी.
  • झोपताना उशीचा आधार घेऊन झोपावे, असे केल्याने कंबरेवरील दाब कमी होतो.
  • प्रेग्नन्सीमध्ये हलके व्यायाम पाठदुखीपासून आराम देऊ शकतात.
  • जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नये.
  • प्रेग्नन्सीमध्ये आरामदायी चप्पला वापराव्यात.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रेग्नन्सी बेल्ट वापरता येईल.

प्रेग्नन्सीमध्ये पुढील गोष्ट टाळा –

  • जड वस्तू उचलणे टाळा.
  • पाठ सरळ ठेवूनच बसावे.
  • खाली वाकताना व्यवस्थितपणे वाकणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेणे टाळा.
  • वजन नियंत्रणात ठेवावे.
  • आहारात हेल्दी डाएटचा समावेश करावा.

 

 

हेही पाहा –

Comments are closed.