किडे-मुंग्यांनी हैराण? करा हे सोपे उपाय
पावसाळ्यात घरात किडे, मुंग्या शिरणे ही सामान्य गोष्ट आहे. या दिवसातील वाढत्या आर्द्रतेमुळे यांचा प्रार्दुभाव घरात वाढू लागतो. पण, या किटकांमुळे आपण आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय पावसाळ्यात दरवर्षी डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची दहशत दिसून येते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपण आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही सुद्धा किडे, मुंग्यानी हैराण झाले असाल तर आजच्या लेखात जाणून घेऊयात यांपासून सुटका मिळण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय.
कडुलिंबाचे झाड –
कडुलिंबाची पाने तोडून पाण्यात गरम करून घ्यावीत. यानंतर तयार पाणी स्प्रे बाटलीत भरावे आणि गरजेनुसार वापरावे. तुम्ही कापसाच्या बोळ्यांवर हे पाणी टाकून बोळे घराच्या कानाकोपऱ्यात ठेवू शकता.
लिंबू –
लिंबाचा सुगंध आणि त्याचा रस मुंग्याना पळवून लावण्यासाठी खूप प्रभावी असतो. घरात जिथे मुंग्या दिसतील तिथे लिंबाचा रस शिंपडा, मुंग्या निघून जातील.
हळद आणि मीठ –
घराच्या भिंती, खिडक्याजवळ हळद आणि मीठ मिक्स करून त्याती रेष आखा. यामुळे मुंग्या आणि किटक घराकडे फिरकणार नाहीत.
बेकिंग सोडा –
मिरची आणि बेकिंग सोडा मिक्स करून त्याचे मिश्रण घराच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे मुंग्यापासून सुटका होईल.
साबणाचे पाणी –
साबणाचे पाणी घरातील किटक, मुंग्या दूर करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. यासाठी डिशवॉशिंग सोप पाण्यात टाका. तयार पाणी फेसाळ तयार होईल. आता स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून ठिकठिकाणी स्प्रे करा.
हळद आणि काळी मिरीचे –
हळद आणि काळी मिरीचे मिश्रण घरातील किड्यांना बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
हेही पाहा –
Comments are closed.