कोरिओग्राप्राहरेरा सरोज सरोजा कन्नोजा खोनी: जग

सरोज खान… बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसाठी त्या मास्टरजी होत्या. कारण त्यांना मदर ऑफ डान्स या नावाने ओळखले जायचे. आपल्यासाठी सरोज यांनी नृत्यदिग्दर्शन करावं अशी अनेक मोठ्या स्टार्सची इच्छा असायची. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 2 हजारांहून अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले होते. त्यांच्या योगदानासाठी त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.

बऱ्याच जणांना हे माहित नसावे की सरोज खान यांचे मूळ नाव हे निर्मला नागपाल होते. सरोज यांच्या वडिलांनी त्यांचे नाव बदलले. त्या चित्रपटात काम करतात हे कुटुंबातील इतर सदस्यांना कळू नये म्हणून नाव बदलल्याचे सरोज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. विभाजनानंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात परतले. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद सद्धू सिंह आणि आईचे नाव नोनी सद्धू सिंह असे होते. आर्थिक परिस्थितीमुळे सरोज खान या फार कमी वयात काम करू लागल्या. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केले. तसेच 50 च्या दशकाच्या शेवटी त्यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

13 व्या वर्षी गुरुसोबतच लग्न

सरोज खान यांनी वयाच्या 13 व्या वर्षी डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी लग्न केले. बी. सोहनलाल हे सरोज यांचे गुरू होते. सरोज यांचे बी. सोहनलाल यांच्याशी लग्न झाले तेव्हा त्यांचे आधीच एक लग्न झालेले असून त्यांना चार मुलेही आहेत हे सरोज यांना माहित नव्हते. लग्न करण्यासाठी सरोज यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. एका मुलाखतीत सरोज यांनी याबद्दल बोलताना स्पष्ट केले होते की, ‘मी स्वखुशीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाममधून मला प्रेरणा मिळते’.

अशी होती कारकीर्द

त्यांनी 1947 मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक काम करण्यास सुरुवात केली. पुढे श्रीदेवी यांच्या ‘मै नागिन तू सपेरा’ या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सरोज यांनी केले. त्यानंतर मिस्टर इंडियातील ‘हवा हवाई’ गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांचे विशेष कौतुक झाले. त्यानंतर ‘धक धक करने लगा’, ‘एक दो तीन’, ‘तम्मा तम्मा’ आणि ‘डोला रे डोला’ या हिट गाण्यांमुळे सरोज यांना यशस्वी नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.

सरोज यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. डोला रे डोला, एक दो तीन ये इश्क हाए या गाण्यांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या नृत्यदिग्दर्शक होत्या. तसेच सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक श्रेणीमध्ये सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. कलंक चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितवर चित्रित झालेले ‘तबाह हो गये’ हे गाणे सरोज यांचे अखेरचे काम ठरले. 3 जुलै 2020 रोजी सरोज खान यांनी जगाचा निरोप घेतला.

Comments are closed.