Red Saree Look Tips: सणावारासाठी ट्राय करा रेड साडी लूक
श्रावण महिन्यात अनेक सणवार येत असतात. त्यामुळे या प्रत्येक सणासाठी वेगवेगळे आऊटफिट्स आपण शोधात असतो. सण म्हंटले की साडी ही सर्वात उत्तम पर्याय असते. त्यामुळे या श्रावणात सणावारासाठी तुम्ही रेड साडी लूक ट्राय करू शकता. म्हणजेच लाल रंगातील साडी तुमच्यावर शोभून दिसेल. तसेच लाल रंग हा शुभ आणि उर्जेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे सणावारासाठी तुम्ही कोणत्या लाल रंगाच्या साड्या निवडू शकता ते पाहू..
बनारसी रेड साडी
बनारसी साड्यांमुळे शाही लूक येतो. त्यामुळे सणावारासाठी लाल बनारसी साडी हा एक उत्तम पर्याय आहे. या साडीवर सोन्याचे दागिने शोभून दिसतात. जर तुम्हाला सोन्याचे दागिने घालायचे नसतील तर तुम्ही ग्रीन कुंदन ज्वेलरी घालू शकता.
कांझीवारम लाल साडी
जर तुम्हाला साउथ इंडियन लूक करायचा असेल तर लाल रंगाची कांजीवरम साडी ही एक उत्तम पर्याय आहे. बनारसी साड्यांप्रमाणेच कांजीवरम साडी शाही लूक देते.
रेड नेट साडी
सणासुदींमध्ये आपण नेहमी हेव्ही सिल्क साड्या निवडतो. पण जर तुम्हाला एखादी हलकी साडी हवी असेल तर तुम्ही लाल रंगाची नेटची साडी निवडू शकता. यामुळे तुमचा लूक आकर्षक दिसेल.
जॉर्जेट साडी
सध्या जॉर्जेट साडी हा नवीन प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. ही साडी एकदम कम्फर्टेबल असते. तसेच मॉडर्न लूक देशील येतो.
मुद्रित लाल साडी
जर तुम्हाला हेव्ही साड्या नको असतील तर तुम्ही प्रिंटेड लाल साडी निवडू शकता. यासोबत ग्लॉसी मेकअप कॅरी करू शकता.
Comments are closed.